Omicron variant Sakal
मुंबई

धारावीसह मुंबईत ओमिक्रॉनचे तीन नवे रुग्ण

राज्यातील बाधितांची संख्या १७ वर

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : पहिल्या लाटेत कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीतही आता ओमिक्रॉनने शिरकाव केला आहे. काही दिवसांपूर्वी पूर्व आफ्रिकेतील टांझानियातून धारावी येथे आलेल्या ४८ वर्षीय व्यक्तीस ओमिक्रॉनची लागण झाल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. आज राज्यात ओमिक्राॅनचे सात रुग्ण आढळले आहेत. यात मुंबईतील तीन रुग्ण व चार रुग्ण पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील आहेत.  त्यामुळे राज्यातील ओमिक्रॉन बाधितांची संख्या १७ झाली आहे. मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, धारावीत सापडलेला ओमिक्रॉनचा रुग्ण हा टांझानिया येथून आलेला आहे.

त्याचा कोरोना अहवाल काही दिवसांपूर्वीच पॉझिटिव्ह आला होता. पालिकेने त्याच्या स्वॅबचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी कस्तुरबा रुग्णालयातील प्रयोगशाळेत पाठवले होते. त्यात त्याला ओमिक्रॉनची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर संबंधित रुग्णाला सेव्हन हिल्स रुग्णलयात दाखल करण्यात आले होते. त्याची प्रकृती स्थिर असून इतर कोणतीही लक्षणे नाहीत. या व्यक्तीच्या निकट संपर्कात आलेल्या व्यक्तींची तपासणी करण्यात आली असून त्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती जी-उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली.

याशिवाय एक २५ वर्षीय व्यक्ती लंडन येथून १ डिसेंबर रोजी; तर ३७ वर्षीय व्यक्ती दक्षिण आफ्रिका येथून ४ डिसेंबर रोजी मुंबईत आले होते. कोविड चाचणीत दोघेही पाॅझिटिव्ह आढळल्याने त्यांचे नमुने जिनोम सिक्वेसिंगसाठी पाठवण्यात आले. आज पालिकेला मिळालेल्या अहवालानुसार दोघेही ओमिक्राॅनबाधित आढळले आहेत. दोघांचेही लसीकरण पूर्ण झाले आहे. त्यांच्या निकटच्या संपर्कातील व्यक्तींच्याही चाचण्या करण्यात येत असून कोणीही बाधित आढळलेले नाही.

आंतरराष्ट्रीय प्रवासाबाबत माहिती द्या!

ओमिक्राॅनबाबत नागरिकांनी भीती न बाळगता आपले लसीकरण पूर्ण करावे आणि मागील महिन्याभरात जे प्रवासी आंतरराष्ट्रीय प्रवास करून भारतात आले आहेत, त्यांनीही आपल्या प्रवासाबाबत स्थानिक आरोग्य विभागास कळवावे, असे आवाहन मुंबई महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

​साडेतीन वर्षांच्या बाळाला ओमिक्रॉनची लागण

राज्यात आज आढळलेल्या सात रुग्णांपैकी ४ जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.  एका रुग्णाने लशीचा एकच डोस घेतला आहे; तर एका रुग्णाचे लसीकरण झालेले नाही. एका रुग्णाचे वय साडे तीन वर्षे असल्याने लसीकरण झालेले नाही. तीन रुग्ण लक्षणेविरहित; तर उर्वरित रुग्णांमधील लक्षणे सौम्य स्वरूपाची आहेत.

धारावीतील ओमिक्रॉनबाधित रुग्ण टांझानिया या हायरिस्कमधील देशातून आल्याने पालिकेकडून उपाययोजना केल्या जात आहे.

- डॉ. मंगला गोमारे, कार्यकारी आरोग्य अधिकारी, महापालिका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : मुंबईत दुसऱ्या दिवशीही मुसळधार पाऊस सुरुच, रायगड, पालघरमध्ये शाळांना सुट्टी; रेड अलर्ट जारी, पुढील ४ दिवस धोक्याचे

पोलिस उपायुक्तांचे आदेश! ट्रॅफिक पोलिस नेमलेल्या ठिकाणीच असणे बंधनकारक; ‘HSRP’ नंबरप्लेट नसलेल्या वाहनांवर ‘आरटीओ’ करणार कारवाई; रिक्षा चालकांना ड्रेसकोडचे बंधन

चोरीचे दागिने घेणारा सराफही आरोपी! पावतीशिवाय दागिने घेतल्यास पोलिसांकडून कारवाई; ‘या’ कलमाखाली 3 वर्षांपर्यंत कारावास अन्‌ दंडाची शिक्षा, वाचा...

जिल्हा परिषदेच्या भन्नाट योजना! महिलांना शिलाई मशीन, पिठाची गिरणी; सातवी ते बारावीतील मुलींना सायकली, टॅली, MS-CIT, कराटे प्रशिक्षण, गरीब मुलांना पैसेही

Best Banana French Toast: बिझी मॉर्निंगसाठी बेस्ट! 10 मिनिटांत बनवा बनाना फ्रेंच टोस्ट; लिहून घ्या सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT