Fake Doctor arrested
Fake Doctor arrested esakal
मुंबई

मुरबाडमध्ये चुकीच्या इंजेक्शनमुळे तीन जणांचा मृत्यू; बोगस डॉक्टर गजाआड

मुरलीधर दळवी

मुरबाड : तालुक्यातील धसई येथे एका बोगस डॉक्टरने (Fake Doctor) चुकीचे उपचार (fake treatment) केल्याने बाप-लेकीसह तीन आदिवासींना आपला जीव गमवावा लागला. याप्रकरणी टोकावडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला (Police complaint Filed) असून पोलिसांनी पांडूमामा घोलप (Pandumama Gholap arrested) या धसई प्राथमिक आरोग्य केंद्रातील सेवा निवृत्त शिपायाला अटक केली आहे. याप्रकरणी डॉ.उमेश वाघमोडे यांच्या तक्रारीनुसार या बोगस डॉक्टर विरोधात टोकावडे पोलिस ठाण्यात भा.द.वी.304 (अ) 420 सह महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियन 33 (2)(अ) 33(अ) 2 (अ)  अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या शिपायाने घरच्या घरी दवाखाना सुरु करुन परवानगी नसताना तो उपचार करत होता डॉ.नंदकिशोर गोरडे हे मंगळवारी २५ तारखेला ड्युटीवर असताना रात्री साडेदहाच्या सुमारास धसई चिखली येथील महिला आशा बुधाजी नाईक वय (30) पायाला दुखापत होत असल्याने उपचार घेण्यासाठी आली होती.

तीव्र वेदना होत असल्याने डॉ. गोरडे यांनी त्या महिलेला तपासले असता कंबरेच्या मागील बाजूस ज्या ठिकाणी इंजेक्शन देतो तेथे सूज येऊन चामडी निघाली असल्याचे निदर्शनास आले.असाच प्रकार मिल्हे येथिल  सावऱ्याची वाडी येथील रामा भिवा आसवले व अलका रामा आसवले या दोघांवर पांडुरंग घोलप यांनी 24 तारखेला उपचार केले होते. हे तिन्ही व्यक्ती चुकीच्या उपचाराचे बळी ठरले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Action: ग्राहक चिंतेत! येस बँक आणि ICICI बँकेवर आरबीआयची मोठी कारवाई; काय आहे प्रकरण?

Latest Marathi Live News Update : पुणे-सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटात वाहनांच्या लांबलचक लांब रांगा

Shahid Kapoor And Mira Rajput: शाहिद अन् मिरानं वरळीत घेतलं आलिशान घर; किंमत माहितीये?

Rafael Nadal French Open 2024 : लाल मातीचा बादशहा नदाल पहिल्या फेरीत बाहेर

Rahul Gandhi: सावरकरांची बदनामी प्रकरण; पुणे पोलिसांनी कोर्टाला असं काय सांगितले? ज्यामुळे राहुल गांधींच्या अडचणी वाढणार

SCROLL FOR NEXT