मुंबई

फडणवीस सरकारच्या काळातील 'त्या' महत्त्वाकांक्षी मोहिमेची महाविकास आघाडी सरकार करणार चौकशी

सुमित बागुल

मुंबई :महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेश सुरु आहे. आज अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. अशात आजच्या दिवसाची सुरवातच नाना पटोले आणि विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यातील खडाजंगीने झाली.

फडणवीस सरकारच्या काळात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड मोहीम हाती घेतली गेलेली. महाराष्ट्रात ३३ कोटी वृक्ष लागवड मोहीम फडणवीस सरकारतर्फे राबवली गेली होती. मात्र आता महाविकास आघाडी सरकारकडून फडणवीसांच्या काळात राबवलेल्या 33 कोटी वृक्ष लागवडीच्या मोहिमेची विधिमंडळाच्या संयुक्त समितीतर्फे चौकशी करण्यात येणार आहे.

स्वतः अजित पवार यांनीही याबाबत सभागृहात माहिती दिली. फडणवीस सरकारच्या महत्त्वाकांक्षी ३३ कोटी वृक्ष लागवडीच्या मोहिमेची विधिमंडळाच्या संयुक्त समितीतर्फे चौकशी होणार आहे. यानंतर सहा महिन्यात चौकशीचा अहवाल तयार केला जाणार असल्याचेही अजित पवार म्हणालेत.

नक्की चौकशी कशाची होणार ? 

३३ कोटी वृक्षलागवड मोहिमेअंतर्गत २०१६-१७ ते २०१९-२० या दरम्यान २४२९.७८ कोटी निधी मिळाला होता. हा निधी पूर्णपणे वापरला देखील गेला होता. मात्र या काळात लावण्यात आलेल्या झाडांपैकी २५ टक्केही रोपं जिवंत का राहिली नाही?  याची चौकशी सरकारकडून केली जाणार आहे. 

उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणालेत की... 

यावर उत्तर देताना विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणालेत की, याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी लेखी उत्तर दिलेले आहे. आता मुख्यमंत्र्यांच्या उत्तरावर मंत्र्यांचा विश्वास नाही का ? आम्ही कोणत्याही चौकशीला घाबरत नाही. मात्र तुमचा तुमच्या मुख्यमंत्र्यांवर विश्वास नाहीये का? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. 

three plantation drive in maharashtra mahavikas aaghadi government will conduct enquiry

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPO Alert: NSE सह 5 IPO येणार! कोणता IPO देऊ शकतो सर्वाधिक Listing Gain? NSE IPO चा GMP किती?

सारखेनंतर आता ताटातली पोळीही महाग; एका महिन्यात गव्हाच्या दरात तब्बल २०० रुपयांची वाढ

Ganesh Chaturthi 2026: आपण गणपती बाप्पा म्हटलं की ‘मोरया’ का म्हणतो? या जयघोषामागे आहे एका गणेशभक्ताची कहाणी

Marathi News Live Updates : तलावातून निघते गणरायाची पालखी; रायगडच्या साले गावातील अनोखी परंपरा

Ganesh Chaturthi 2026: बाप्पाच्या चरणांशी उंदीर का असतो? उंदीर मामा कसा बनला गणपती बाप्पाचे वाहन? जाणून घ्या रंजक कथा!

SCROLL FOR NEXT