hospital  
मुंबई

ठाण्यातील तीन खासगी रुग्णालयांना दणका, 'या' कारणाने रुग्णालये सील

राजेश मोरे

ठाणे : उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार, तसेच अग्निशमन दलाचे ना हरकत प्रमाणपत्र व जैववैद्यकीय सुविधा नसल्याने ठाणे शहरातील तीन रुग्णालये आज सील करण्यात आली. महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशान्वये ही कारवाई करण्यात आली. 

ठाणे शहरातील साईसेवा हेल्थ सेंटर, भास्करनगर, कळवा; जनसेवा हॉस्पिटल, वाघोबानगर, कळवा आणि श्री मातोश्री आरोग्य केंद्र, वाघोबानगर, कळवा ही रुग्णालये अनधिकृत असल्याबाबतची जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. या याचिकेवरील सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयाने ही रुग्णालये बंद करण्याचा निर्णय दिला होता. 

उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने या रुग्णालयांना नोटीस देण्यात आली होती. तसेच त्यांच्याकडे सर्व कागदपत्रे आहेत का? याची तपासणी करण्यात आली होती. या तपासणीमध्ये रुग्णालयांकडे फायर एनओसी आणि जैववैद्यकीय कचऱ्याची सुविधा नसल्याने ही रुग्णालये बंद करण्याची नोटीस दिली होती. तथापि नोटीस दिल्यानंतरही ही रुग्णालये सुरू असल्याचे निदर्शनास आल्यानंतर महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी ही रुग्णालये सील करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. मुरूडकर यांनी आज सकाळी ही तीनही रुग्णालये सील केली. 

(संपादन : वैभव गाटे)

three private hospitals are seal in thane after order by court

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT