hair cutting
hair cutting 
मुंबई

घरातच सलून अन् हातात कात्री, लॉकडाऊन दरम्यान लोकांनी घरीच कापले केस

सकाळवृत्तसेवा

प्रभादेवी : लॉकडाउनच्या काळात केशकर्तनालये बंद असल्याने डोक्यावर वाढलेल्या केसांच्या जंगलाचे करावे काय, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्यावर उपाय म्हणून हातात कात्री घेत घरीच कट मारण्याचा उपाय अनेकांनी अवलंबला आहे. 

केशकर्तनालयामध्ये ग्राहक आणि कर्मचारी यांचा जवळून संपर्क होतो. कोरोनाचा धोका पाहता सुरक्षिततेच्या कारणास्तव सर्व केशकर्तनालये बंद ठेवण्यात आली. लॉकडाउनचा कालावधी 21 दिवसांवरून पुन्हा 15 दिवसांचा वाढविल्यामुळे महिना दीड महिन्यात डोक्यावर वाढलेल्या केसांमुळे पुरुषांचा अवतार चांगलाच बदलत आहे. त्यामुळे घरच्या घरी ट्रिमर, कात्रीच्या सहाय्याने केस बारीक करण्याचे प्रयोग सुरू झाले आहेत.  

लाॅकडाऊनमुळे मुलांचेही केस वाढले. त्यामुळे लॉकडाउनचा कालावधी संपण्याची वाट न पाहता मुलांचे केस कापण्यासाठी वडिलांनीच हातात कात्री घेत केस कापण्यासाठी पुढाकार घेतला आहे. ऐरवी सलूनमध्ये जात सलमान खान, शाहरुख खान, अजय देवगण अशा कलावंतांप्रमाणे केसांची स्टाईल करणाऱ्या तरुणांना सध्या घरीच बसून साधी कट मारावी लागत आहे; तर काहींनी चक्क टक्कलच केले. असे फोटोही समाजमाध्यमांवर चांगलेच व्हायरल होत आहे. 

मुंबईत बहुतांशजण भाडे भरून केशकर्तनालये चालवतात. लॉकडाउननंतरही केशकर्तनालये बंद राहिल्यास कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ येईल, असे नाभीक संघटनेतर्फे सांगण्यात आले आहे. 

महाराष्ट्रात जवळपास 5 लाख केशकर्तनालयांत 20 लाख कर्मचारी आहेत. आम्ही 18 टक्के जीएसटी भरतो; मात्र लॉकडाऊनमुळे केशकर्तनालयातील कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. लाॅकडाऊननंतर केशकर्तनालय सुरू करण्यासाठी  सरकारने आम्हाला गाईडलाईन द्यावी, तसेच कर्मचाऱ्यांना सहाय्यता निधी द्यावा.
-  दत्ता अनारसे, अध्यक्ष, महाराष्ट्र नाभीक महामंडाळ

 लॉकडाउन नंतर सरकारने केशकर्तनालये सुरू करण्यासाठी नियमावली आखून द्यावी जेणेकरून त्या नियमावली नुसार केशकर्तनालये सुरू करता येवू शकतील व ग्राहकांची विश्वासाहर्ता जपता येईल
- तुषार चव्हाण, उपाध्यक्ष, सलून ब्युटी पार्लर असोसिएशन

The time brought by the lockdown; Some did hair cutting at home 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayawati: "जोपर्यंत तो पूर्ण..." मायावतींनी तडकाफडकी भाच्याला राष्ट्रीय संयोजक पदावरून हटवले

Russia-Ukraine War: मानवी तस्करी प्रकरणी सीबीआयची मोठी कारवाई, रशियन नागरिकासह चौघांना अटक

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 08 मे 2024

ढिंग टांग : अस्सावा सुंदर नोटांचा बंगला..!

Latest Marathi News Live Update : अरुणाचल प्रदेशात भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर 3.1 तीव्रता

SCROLL FOR NEXT