Jitendra Awhad sakal media
मुंबई

अजूनही वेळ गेलेली नाही...;जितेंद्र आव्हाडांचं ओबीसी नेत्यांना आवाहन

देशभरात ओबीसींच राजकीय आरक्षण रद्द झालंय

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : देशभरातील ओबीसींचं राजकीय आरक्षण (OBC Reservation) धोक्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी ओबीसी नेत्यांना महत्वाचं आवाहन केलं आहे. "अजूनही वेळ गेलेली नाही, चला एक होऊया" असं त्यांनी म्हटलं आहे. आव्हाडांनी यासंदर्भात ट्वीट केलं आहे. (Time has not yet passed Jitendra Awhad appeal to OBC leaders)

"देशभारत ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द झालं. यामुळं ११ लाख लोक प्रतिनिधीनी आपली पदं गमावली. राजकीय आरक्षण गेल्यामुळं ओबीसी मुख्य प्रवाहातून बाहेर फेकला जाईल. हीच ११ लाखांची ताकद रस्त्यावर उतरली असती तर नवीन इतिहास लिहिला गेला असता. अजूनही वेळ गेलेली नाही, चला एक होऊया..." असं आवाहन आव्हाड यांनी केलं आहे.

दरम्यान, नुकतंच आव्हाडांनी ओबीसींबाबत एक विधान केलं होतं, त्याला उत्तर देताना भाजपच्या राष्ट्रीय ओबीसी मोर्चाचे सदस्य आणि मुंबई भाजपचे सचिव प्रतीक कर्पे यांनी जोरदार टीका केली होती. कर्पे म्हणाले होते, "गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांना सत्तेची उब मिळाल्याने ते आता ओबीसी बांधवांना विसरले आहेत. त्याचमुळे ओबीसींवर माझा विश्वास नाही, ओबीसींना लढायचेच नसते अशी अपमानकारक विधाने ते करीत आहेत"

काय म्हणाले होते जितेंद्र आव्हाड?

सावित्रीच्या लेकींच्या सन्मान सोहळ्यात आव्हाड यांनी नुकतीच ओबीसी समाजावर वरीलप्रमाणे टीका केली होती. "ओबीसींच्या आरक्षणासाठी मंडल आयोग आला, पण त्यासाठी लढायची वेळ आली तेव्हा लढाईसाठी ओबीसी मैदानात नव्हते. तर लढायला होते ते महार आणि दलित, ओबीसींना लढायचेच नसते. ओबीसींवर ब्राह्मण्यवादाचा इतका पगडा बसलाय की आपण श्रेष्ठ आहोत, असे त्यांना वाटते. पण चार-पाच पिढ्यांपूर्वी आपल्या बापांना-आज्यांना मंदिरप्रवेश नव्हता हे ते विसरलेत, असे उद्गार आव्हाड यांनी काढले होते. त्यांच्या त्या भाषणाचे व्हिडियो देखील समाजमाध्यमांवर प्रसिद्ध झाले आहेत. त्यासंदर्भात कर्पे यांनी वरीलप्रमाणे टीका केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heavy Rain Maharashtra : राज्यात २० जिल्ह्यांना ऑरेंज, येलो अलर्ट; कमी दाबाच्या क्षेत्राचा विदर्भावर परिणाम, पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार

Maratha Reservation: मनोज जरांगे यांची मोठी घोषणा; १५ सप्टेंबरला मुंबईकडे कूच, १९ पासून आझाद मैदानावर बेमुदत उपोषण

Pilbhit Tiger Reserve: व्याघ्र प्रकल्पात विकेंड सफारी महागली; शनिवार-रविवारचे तिकीट २०० रुपयांवर, काय आहे कारण ?

Team India Live Streaming: सुपर संडे! भारताचे दोन मोठे सामने, Asia Cup Final अन् अफगाणिस्तानविरुद्ध रंगणार टी२०; कुठे पाहाणार?

Ukadiche Modak Recipe: केशराचा सुगंध, नारळ-गुळाची गोडी आणि 'हा' एक पदार्थ… बाप्पासाठी असे बनवा स्पेशल उकडीचे मोदक!

SCROLL FOR NEXT