Kamala Mills Fire 2017 Esakal
मुंबई

Times Tower Fire: कमला मिल्स परिसरातील आगीत जेव्हा 14 जणांनी गमावला होता जीव; 200 लोकांसोबत 2017 मध्ये नेमकं काय घडलं होतं?

Kamala Mills Fire 2017: 29 डिसेंबर 2017 रोजी रात्री 12:22 वाजता आग लागली होती. आग लागली तेव्हा इमारतीच्या आत अंदाजे 200 लोक होते.

आशुतोष मसगौंडे

आज पहाटे कमला मिल परिसरातील टाइम्स टॉवरला आग लागली आहे. ही आग इतकी भीषण होती की, ती विझवण्यासाठी अग्नीशमन दलाच्या 9 गाड्या प्रयत्न करत होत्या.

दरम्यान आतापर्यंत यामध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. पण यापूर्वी 2017 मध्ये याच परिसरात लागलेल्या आगीत तब्बल 14 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. आजच्या या घटनेमुळे पुन्हा एकदा 7 वर्षांपूर्वीच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.

29 डिसेंबर 2017

29 डिसेंबर 2017 रोजी, मुंबईच्या लोअर परेल येथील कमला मिल्स या व्यावसायिक संकुलात रात्री 12:22 वाजता आग लागली. या आगीत १४ जणांचा मृत्यू झाला होता. तर 55 जण जखमी झाले होते.

ही आग एका बारमध्ये सुरू झाली आणि त्यानंतर शेजारी असलेल्या पबमध्ये पसरली. या आगीने पुढे इतके भीषण रूप धारण केले की, त्यामुळे इमारतीतील इतर अस्थापनांमध्येही पसरली होती.

आग लागली तेव्हा बिल्डिंगमध्ये होते 200 लोक

कमला मिल्स कंपाऊंडमधील तीन मजली ट्रेड हाऊस इमारतीच्या छतावर असलेल्या 1 Above नावाच्या बारमध्ये 29 डिसेंबर 2017 रोजी रात्री 12:22 वाजता आग लागली होती. आग लागली तेव्हा इमारतीच्या आत अंदाजे 200 लोक होते.

पुढे ही आग बांबूच्या छतापर्यंत आणि तेथून शेजारच्या 'मोजो'ज पबमध्ये पसरली. यानंतर या आगीने भीषण रूप धारण केले आणि शेजारी असलेल्या पाच मीडिया हाऊसेसलाही याचा फटका बसला. सुमारे 30 मिनिटांत इमारतीचा संपूर्ण वरचा भाग आगीच्या भक्ष्यस्थानी पडला होता.

काय आहे कमला मिल्स?

कमला मिल्स हे मुंबईतील लोअर परेलमधील एक व्यावसायिक संकुल आहे. तेथे अनेक व्यावसायिक कार्यालयांव्यतिरिक्त 30 हून अधिक रेस्टॉरंट आणि बार आहेत. शहरातील व्यावसायिक वापरासाठी पुनर्विकसित केल्या गेलेल्या गिरणी क्षेत्रांपैकी हा एक परिसर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates: अर्जेंटिनाचा यशस्वी दौऱ्यानंतर , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ब्राझीलची राजधानी रिओ दि जनेरियो इथं भव्य स्वागत

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT