to pay off the debt theft case police arrest accused dombivali mumbai sakal
मुंबई

Mumbai Crime : कर्ज फेडण्यासाठी  त्याने निवडला चोरीचा मार्ग...हाती पडल्या बेड्या

भिवंडी येथील चोरास कल्याण लोहमार्ग पोलिसांनी केली अटक

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - डोक्यावर कर्ज झाल्याने त्याने चोरीचा मार्ग निवडला. कल्याण रेल्वे स्टेशन येथे रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचून त्याने पळ काढला. पण महिलेने आरडा ओरडा केला आणि चोरटा कल्याण लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात सापडला. याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून रोशन नथू पाटील (वय 29) याला पोलिसांनी अटक केली आहे.

भिवंडीच्या दौडा वडवली परिसरात राहणारा रोशन हा कर्जबाजारी झाला होता. त्यामुळे कर्जमुक्त होण्यासाठी त्याने चोरीचा मार्ग निवडला. यासाठी भिवंडीवरून त्याने कल्याण स्टेशन गाठले. रात्री अंधारात स्टेशनची पूर्ण पाहणी करून अंधार असलेल्या जिन्यावर तो सोनं घालून येणाऱ्या महिला प्रवाशांची वाट पाहू लागला.

रात्री तीनच्या दरम्यान त्याला एक महिला मोठा सोन्याचा हार घालून येताना दिसली. रोशनने अंधाराचा फायदा घेत तिच्या गळ्यातील सोन्यावर आपला हात साफ केला. हार खेचत त्या ठिकाणाहून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र महिलेने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली.

महिलेचा आवाज ऐकून पोलीस त्या दिशेने धावले. महिलेने मोठमोठ्याने ओरडत चोरट्याचा पाठलाग सुरू केला. स्टेशन परिसरात तैनात असलेल्या कल्याण लोहमार्ग पोलिसांनी आणि कल्याण रेल्वे पोलिसांनी देखील आरोपीच्या दिशेने धावत आरोपीचा पाठलाग केला. अखेर पोलिसांनी झडप घालत त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे दीड लाख रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र पोलिसांना सापडले.

कल्याण लोहमार्ग पोलिसांनी रोशन याच्यावर गुन्हा दाखल करत अटक केली आहे. त्याच्यासोबत या चोरी मध्ये आणखी कोणी सहभागी होते का याचा पोलीस शोध घेतला जात असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांनी सांगितले. चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. कर्जबाजारी झाल्याने रोशनने चोरीचा मार्ग निवडला. भिवंडी येथून तो कल्याण स्टेशनवर चोरी करण्यासाठी आला. मात्र यात तो सफल झाला नाही. कर्ज फिटण्या ऐवजी त्याच्या हातात पोलिसांच्या बेड्या पडल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

What is Anjaneri Ropeway Project? हनुमान भक्तांसाठी मोठी बातमी! सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी अंजनेरीला मिळणार नवं रूप; आता डोंगरावर चढण्याची कसरत संपणार!

NCP MLAs leaving party : राष्ट्रवादी काँग्रेसचे २५ ते ३० आमदार पक्ष सोडणार?, हसन मुश्रीफांनी एका वाक्यात कंडका पांडला

Latest Marathi News Live Update : हवामान खात्याकडून रायगडला अवकाळी पावसाचा इशारा

तिथे जाऊन संसार... विदेशात सेटल व्हायला का तयार नाहीये उमेश कामत? प्रियाला म्हणाला- तुला जायचं असेल तर जा पण...

IPL सुरू असतानाच दक्षिण आफ्रिकेच्या स्टार खेळाडूची अचानक निवृत्तीची घोषणा, वार्षिक करारातून वगळ्यानंतर घेतला निर्णय; म्हणाला...

SCROLL FOR NEXT