Devendra Fadnavis 
मुंबई

ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल ही भविष्याची नांदी - फडणवीस

शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेना आणि भाजप भविष्यातही एकत्र लढणार, शिंदेंचीच खरी शिवसेना दुसरीकडे केवळ शिल्लक सेना.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : ग्रामपंचायत निवडणुकांचे आजचे निकालांनी शिवसेना-भाजप युतीवर शिक्कामोर्तब केलं आहे. हे निकाल भविष्याची नांदी आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालांवर भाष्य केलं आहे. मुंबईतील कोस्टर रोड प्रकल्पाच्या भेटीदरम्यान ते माध्यमांशी बोलत होते.

फडणवीस म्हणाले, "आजच्या ग्रामपंचायतींच्या निकालांनी शिवसेना-भाजप युतीवर शिक्कामोर्तब केलं आहे. तुम्ही शिंदे गट जे म्हणता तो शिंदे गट नाही तर ही शिवसेना आहे तिकडे शिल्लक सेना आहे. आमच्यासोबत आलेली शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांनी प्रेरित, त्यांच्या विचारांवर चालणारी हिंदुत्वावर चालणारी शिवसेना आहे. ही शिवसेना आणि भाजपच्या युतीला लोकांनी स्विकारलं आहे. साडे पाचशेपेक्षा तीनशे पेक्षा जास्त ठिकाणी आम्ही निवडून आलो आहोत. ही भविष्यातील नांदी आहे. शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेना आणि आम्ही एकत्र लढणार आहोत"

कोस्टल रोड मुंबईचा ड्रीम प्रोजेक्ट

कोस्टल रोड हा मुंबईचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. मुळात ही संकल्पाना २५ वर्षे जुनी आहे, पण ती कधीच अस्तित्वात येत नव्हती. २०१४ मध्ये आमचं सरकार आलं तेव्हा मी स्वतः मोदींकडे गेलो आणि तेव्हा आमच्या सरकारनं यासाठी परवानगी मिळवली. आपल्याकडं कोस्टल रोडकडं परवानगी मिळवण्यासाठी कुठलाही कायदा नव्हता त्यामुळं दोन वर्षात प्रयत्न करुन या सर्व परवानग्या आपण मिळवल्या त्यानंतर याचं काम सुरु झालं. आता स्वतः मुख्यमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घातलं असून कुठल्याही परिस्थितीत याला उशीर होऊ नये, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळं दोन वर्षात जेवढे इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट बंद पडले होते त्यांना गती द्यायचं काम शिंदेंनी केलं आहे. आम्ही हा प्रकल्प पहायला जरी आज आलो असलो तरी यासंदर्भातील तीन बैठका यापूर्वीच झाल्या आहेत. या तीनही बैठकात या प्रोजेक्टमधील सर्व अडचणी दूर झाल्या आहेत आणि आमचं सरकार हा प्रोजेक्ट पूर्ण करुन दाखवणार आहे.

डिसेंबर 2023 पर्यंत कोस्टर रोड पूर्ण होईल - मुख्यमंत्री

डिसेंबर २०२३ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होईल. सहा लेनचा हा मार्ग आहे. वेस्टर्न हायवेवरील सर्व प्रवाशांसाठी हा महत्वाचा प्रकल्प आहे. या मार्गावर बंपर ट्रॅफिक असते, त्यामुळं या मार्गावरील प्रवाशांसाठी या रस्त्यामध्ये भराव टाकताना भ्रष्टाचार झाला होता. त्याच्या चौकशीबाबत सर्व बाबी तपासून पाहू, असंही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Holiday: पुढच्या आठवड्यात बँका कधी सुरू, कधी बंद? अनंत चतुर्दशीला बँकाना सुट्टी? पाहा पूर्ण अपडेट

मुख्यमंत्र्यांना दारू, अंडी-टोमॅटो देण्याचा प्रयत्न, भाजप नेत्याला घेतलं पोलिसांनी ताब्यात

Nanded Cashew Almond Video : नांदेडच्या बैठकीतील काजू-बदामाचा व्हिडीओ व्हायरल; हिंगोलीत शेतकऱ्यांनी कृषिमंत्र्यांसमोर बशी ठेवत केला निषेध

Ganeshotsav Nigeria: सातारच्या सुपुत्राने नायजेरियात रुजवली गणेशोत्सवाची परंपरा; १६ वर्षांपासून लागोसमध्ये बाप्पाचा जयघोष, सातासमुद्रापार मराठी मातीचा सुगंध

Latest Marathi News Update : मालकाच्या मुलीचा WhatsApp DP पाहिला अन् 3.70 कोटी पाठवले

SCROLL FOR NEXT