corona 2.jpg 
मुंबई

मुंबईत आज ५,८८८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद, १२ रुग्णांचा  मृत्यू

सकाळवृत्तसेवा

मुंबई : मुंबईत आज एकूण 5888 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली,  तर 12 रुग्णांचा मृत्यू झाला. वाढत्या रुग्णसंख्येमुळे पालिका प्रशासनाची चिंता वाढली आहे. तर, सक्रिय रुग्ण ही वाढले असून, काही दिवसांत मुंबईतील सक्रिय रुग्णांनी 47,453 हजारांचा टप्पा गाठला आहे. सक्रिय रुग्ण वाढत असल्याने चिंता ही वाढली आहे. कोरोनाचा पुन्हा एकदा मुंबईत शिरकाव झाला असून आज तब्बल 5888 नवीन रुग्ण आढळल्याने कोरोनाग्रस्तांचा आकडा 4,04,562 वर पोहोचला आहे. तर दिवसभरात 12 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 11 हजार 661 वर पोहोचला आहे. 

दरम्यान 3561 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत 3,44,496  रुग्णांनी कोरोनाला हरवले आहे. मुंबईत सध्या 47,453 सक्रिय रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. 

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण  85 टक्के आहे. 
कोरोना रुग्ण वाढीचा सरासरी दर - 1.27 टक्के आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी कमी होऊन 53 दिवसांवर आला आहे. आतापर्यंत 40,17,316 कोरोना चाचण्या करण्यात आल्या. मुंबईत आज मृत झालेल्या 08 रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मृत्यू झालेल्यांमध्ये 07 पुरुष तर 05 महिला रुग्णांचा समावेश होता. 

मुंबईत 64 इमारती आणि झोपडपट्टया कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले असून सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 578 इतकी आहे. बाधित रूग्णांच्या संपर्कात येणा-या व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत असून गेल्या 24 तासात बाधित रुग्णांच्या संपर्कात 24,808 अति जोखमीचे व्यक्ती आले आहेत. आज कोविड काळजी केंद्र 1 मध्ये 905 अति जोखमीचे संपर्क उपचारासाठी दाखल करण्यात आले.  

धारावीत 64 नवे रुग्ण
धारावीत ही आज कोरोनाचा जोर बघायला मिळाला. धारावीत 64 नवीन रुग्ण सापडले असून एकूण रुग्णांची संख्या 4834 वर पोहोचली आहे. तर 495 सक्रिय रुग्ण आहेत. दादर मध्ये 83 नव्या रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णांची संख्या 5936 वर झाली आहे तर 694 सक्रिय रुग्ण आहेत. माहीम मध्ये सर्वाधिक 98 रुग्ण सापडले असून एकूण रुग्ण 6034 इतके झाले आहेत. तर 840 सक्रिय रुग्ण आहेत. जी उत्तर मध्ये आज 245 नव्या रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णसंख्या 16804 झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लॉन्चपूर्वीच सिक्रेट जगजाहीर! समोर आली Samsung Galaxy A57 अन् A37 स्मार्टफोनची किंमत; पाहा सगळे वेरिएंट एका क्लिकवर

Panchganga river pollution : पंचगंगा नदीत काळेकुट्ट पाणी; ऑक्सिजनअभावी मासे मृत, इचलकरंजीत खळबळ

Ajit Pawar: ''अशोक खरातच्या माध्यमातून अजित पवारांच्या घराबाहेर काळी जादू..'', कुणाचा हात? रोहित पवारांनी सांगितला घटनाक्रम

Monalisa Viral Girl Case : 'व्हायरल गर्ल' मोनालिसाचा चित्रपट दिग्दर्शकावर गंभीर आरोप; म्हणाली, 'सेटवर अनेक वेळा माझ्यासोबत...', मनोरंजन विश्वात उडाली खळबळ

Free AI Courses: गूगल, अ‍ॅमॅझॉसह ह्या ५ कंपन्या देत आहेत फ्री AI शिक्षण; जाणून घ्या कोर्स कुठे आणि कसा करायचा

SCROLL FOR NEXT