मुंबई

आजपासून मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये होणार वाढ; मुंबईकरांना मिळणार दिलासा

तेजस वाघमारे


मुंबई : वर्सोवा- अंधेरी- घाटकोर या मेट्रो 1 च्या वेळांमध्ये सोमवार (ता.14) पासून वाढ करण्यात आली आहे. यामुळे दिवसभरातील फेऱ्यांची संख्या वाढणार आहेत.

लॉकडाउन शिथिल केल्यानंतर 19 ऑक्टोबरपासून मेट्रो 1 ची सेवा सुरू करण्यात आली. सध्या मेट्रो सकाळी 8.30 ते रात्री 8.30 या वेळेत सुरू आहे. या कालावधीत दिवसाला 200 फेऱ्या चालविण्यात येत आहेत. प्रवाशांच्या प्रतिसादानुसार 14 डिसेंबरपासून वाढ करण्यात येणार आहे. त्यानुसार वर्सोवा येथून घाटकोपरसाठी पहिली गाडी सकाळी  7.50, तर घाटकोपरहून वर्सोवासाठी सकाळी 8.15 वाजता सोडण्यात येणार आहे. वर्सोवाहून घाटकोपरसाठी शेवटची गाडी रात्री 8.50, तर घाटकोपरहून वर्सोवासाठी रात्री 9.15 ला सुटेल. यामुळे फेऱ्यांमध्ये वाढ होणार असून सहा ते आठ मिनिटांच्या वारंवारितेने मेट्रोच्या फेऱ्या वाढणार आहेत.

नाताळ - नववर्षांसाठी विशेष गाड्या धावणार; मंगळवारपासून प्रवाशांना बुकिंगची सुविधा

मुंबई :  मध्य रेल्वे मार्गावर नाताळ आणि नववर्षांसाठी पर्यटनासाठी घराबाहेर पडणाऱ्या पर्यटकांसाठी विशेष गाड्या सोडण्यात येणार आहे. लखनऊ, प्रयागराज, रांची, तिरुनेलवेली,  दरम्यान या विशेष गाड्या चालवण्यात येणार आहे. विशेष ट्रेन क्रमांक 02107 आणि विशेष वातानुकूलित ट्रेन क्रमांक 02153 साठी 13 डिसेंबर रोजी तिकीट बुकिंग  सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू केले जाणार आहे.तर कन्फर्म तिकीट असणा-या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये प्रवास करण्याची परवानगी असणार आहे. त्यासोबतच प्रवाशांना बोर्डिंग, प्रवास आणि गंतव्यस्थानी कोविड-19  संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागणार आहे. 

------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रज्वल रेवन्नाचा आणखी एक कारनामा; तुरुंगात जप्त केलेल्या मोबाइलमध्ये सापडले १४५ हून अधिक अश्लील व्हिडीओ

Social Media Election Rules : निवडणूक प्रचारात डीपफेक व्हिडिओ वापराल तर कारवाई; आयोगाचे राजकीय पक्षांना कडक निर्देश

'मी जे केलं ते तुम्ही करू नका...' सिंगल मदरहुडबद्दल नीना गुप्तांचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाल्या...

Chanakya Niti: नशीब बदलत नाही म्हणून निराश आहात? चाणक्य नीतीतील ‘या’ २ सवयी आजपासून अंगीकारा!

हरतालिकेची पूजा का करतात? एका क्लिकमध्ये वाचा व्रताचे महत्त्व!

SCROLL FOR NEXT