vaccination esakal
मुंबई

मुंबईकरांनो आज लसीकरणाला उतरण्याआधी 'ही' बातमी वाचा

काय आहे माहिती?

भाग्यश्री भुवड : सकाळ वृत्तसेवा

मुंबई: कोविड प्रतिबंधक लसींच्या पुरेशा साठ्याअभावी आज (03) जून या दिवशी मुंबईतील शासकीय आणि महानगरपालिका केंद्रांवर लसीकरण (vaccination at govt centeres) बंद राहणार आहे. लशींचा साठा (vaccine stock) ज्या प्रमाणात प्राप्त होईल, त्या अनुरूप योग्य निर्णय घेवून मुंबईकर नागरिकांना सातत्याने अवगत करण्यात येते. दरम्यान, उद्या दिवसभरामध्ये लससाठा प्राप्त होण्याची शक्यता आहे. (Today vaccination at govt centeres in mumbai is closed)

लस साठा उपलब्ध झाल्यानंतर लसीकरण-

लस साठा उपलब्ध झाल्यास पुढील दिवसांपासून लसीकरण पुन्हा सुरू करण्यात येईल. मुंबईकर नागरिकांनी महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, बुधवारी फक्त 15 ते 20 हजार डोस पालिकेकडे शिल्लक होते. 50 लसीकरण केंद्रांवर झालेल्या मोहीमेअंतर्गत दिवसभरात 49,883 एवढ्या जणांचे लसीकरण केले गेले. यात खासगी लसीकरण केंद्रांवर झालेल्या लसीकरणाचाही समावेश आहे. हेल्थकेअर आणि फ्रंटलाइन वर्कर्सला दुसरा डोस दिला गेला.

तर, परदेशी जाणार्‍या 771 विद्यार्थ्यांचे लसीकरण केले गेले. आणि 101 स्तनदा मातांचे लसीकरण केले गेले. दरम्यान, गुरुवारी दिवसभर लसीकरण बंद राहणार आहे. त्यामुळे, नागरिकांनी लसीकरण केंद्रांवर गर्दी करु नये असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG, 1st ODI: भारताने उडवला अफगाणिस्तानचा धुव्वा; कर्णधार गिलची शानदार फिफ्टी, तर केएल राहुलची 'क्लास' फिनिश

Pune Fraud News : गुंतवणुकीच्या आमिषाने १२ कोटींची फसवणूक; पुण्यातील ४६ गुंतवणूकदारांची फसवणूक

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या पथकाची स्वारगेट बस स्टॉपवरील दुकानांवर धाड; ...तोपर्यंत दुकानं बंद ठेवण्याच्या सूचना

Gas Cylinder Shortage : खाद्यपदार्थांच्या दरात वाढ! दरवाढीमुळे हॉटेल व्यवसाय ‘गॅस’वर; बचतीसाठी शेगड्यांचा वापरही कमी

Modi-Trump Meeting: डोनाल्ड ट्रम्प-नरेंद्र मोदी यांची भेट ठरली; व्हाईट हाऊसची मंजुरी, 'या' मुद्द्यांवर होणार चर्चा

SCROLL FOR NEXT