corona update  sakal
मुंबई

पेणमध्ये 'कोरोना' रुग्णसंख्येचा वेगाने प्रसार

नागरिकांकडून नियमांची पायमल्ली

सकाळ वृत्तसेवा

वडखळ : पेण तालुक्यात आठ ते १० दिवसांपूर्वी एकही कोरोनाबाधित रुग्ण नव्हता, परंतु आता तालुक्यात या आजाराचा संसर्ग झपाट्याने होत आहे. आतापर्यंत तालुक्यात १२ हजार ७७३ नागरिकांना कोरोना झाला; तर ११,८६५ नागरिक यामधून मुक्त झाले. सध्या दररोज शेकडो नागरिकांना संसर्ग होत आहे. एकीकडे कोरोनासंदर्भात नियमांचे पालन व्हावे यासाठी सरकारी निर्बंध लावत आहे; तर दुसरीकडे राजकीय मंडळी शेकडोने कार्यकर्ते जमवून आपल्या पक्षाची ताकद वाढवताना दिसत आहेत.(Rapid spread of corona outbreak in Pen)

त्यातच काही सुज्ञ संघटनाही कोरोनाचे नियम तोडून कार्यक्रम घेत आहेत. एकंदरीत, पेण तालुक्यात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे. येत्या आठ दिवसांत पेण तालुक्यात योग्य ती खबरदारी घेतली नाही तर कोरोना संसर्गाचा विस्फोट झाल्याशिवाय राहणार नाही असे जाणकार सांगतात. सध्या दररोज १५० पेक्षा अधिक नवीन रुग्ण सापडत आहेत. पेण शहरात तर विनामास्क फिरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे कारवाई करणे गरजेचे आहे; अन्यथा आरोग्याची स्थिती हाताबाहेर गेल्याशिवाय राहणार नाही. चाचण्या युद्धपातळीवर पेणमध्ये वाढलेला संसर्ग पाहता पेण तालुका आरोग्य अधिकारी अर्पणा खेडेकर यांनी सरकारी कार्यालय तसेच पेण तालुक्याच्या प्रवेशद्वारावर आशाताईंच्या मदतीने कोविड चाचण्या सुरू केल्या आहेत.(Pen corona update)

तालुक्यात मागील १५ दिवसांपूर्वी एकही कोरोना संसर्ग व्यक्ती नव्हती, परंतु गेल्या आठवडाभरात कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत असल्याने सुरक्षतेच्या दृष्टीने पेण तहसील कार्यालय, पेण प्रांत कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, या ठिकाणी चाचण्या करण्यात येत आहेत. तालुक्याचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या खारपाडा पुलावरही चाचणी केली जात आहे. पेण तालुक्यातील सरकारी कार्यालयांत कोरोना चाचणी करण्यात येत आहे; तर महामार्गावर खारपाडा येथे कोरोना चाचणी केंद्र आहे. पेण उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र येथे लसीकरण सुरू आहे; तर गावातील नागरिकांनी मागणी केल्यास त्या गावात आरोग्य कर्मचारी लसीकरण करत आहेत. आतापर्यंत १५ ते १८ वयोगटातील पाच हजार १६३ मुलांचे लसीकरण करण्यात आले आहे. नागरिकानी लसीकरण करून घ्यावे. कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करावे.

- अर्पणा खेडेकर , पेण तालुका आरोग्य अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune: मोशीत बचाव कार्यासाठी अत्याधुनिक यंत्राची मदत; ‘एनडीआरएफ’कडून शर्थीचे प्रयत्न; आठ जणांचा शोध सुरू

Love Affair Wife killed husband : लग्नापूर्वीच संबंध; प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या, मृतदेह नाल्यात फेकून पुरला; 3 महिन्यांनंतर पोलिसांचा धक्कादायक खुलासा

Spain vs Belgium : स्पेन १६ वर्षानंतर वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत; मिकेल मेरिनोचा निर्णायक गोल, बेल्जियमचे आव्हान संपुष्टात

Maharashtra Off-Budget Debt : महसुली तूट वाढली, महाराष्ट्रावर २८ हजार कोटींच्या कर्जाचा डोंगर; कॅगचा गंभीर इशारा

Latest Marathi News Live Update : ऑस्ट्रेलियाचा तीन दिवसांचा दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी न्यूझीलंडमध्ये दाखल

SCROLL FOR NEXT