मुंबई

मुरूडमध्ये मास्कविषयी जनजागृती

CD
मुरूडमध्ये नियमांची कठोर अंमलबजावणी मास्क न वापरणाऱ्यांवर धडक कारवाई सुरू मुरूड, ता. ५ (बातमीदार) : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मुरूड पालिकेने मास्कविषयी जनजागृती सुरू केली आहे. तसेच बुधवार (ता. ५) पासून नियमांची अंमलबजावणी कठोर करण्याचा इशारा देण्यात आला आहे. मुरूड पालिकेतील कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर जनजागृती सुरू केली आहे. मासळी बाजार, मंडई, शाळा आदी ठिकाणी कर्मचारी नागरिकांशी संवाद साधून सामाजिक अंतर, सॅनिटायझरचा वापर, मास्कचे महत्त्व पटवून देत आहेत. मुख्याधिकारी पंकज भुसे यांनी सांगितले, की मास्क घातल्याशिवाय घराच्या बाहेर पडू नका. आपली स्वतःची काळजी घ्यावी. कोरोनापासून दूर राहण्यासाठी त्रिसूत्रीची अंमलबजावणी करणे खूप गरजेचे आहे. बुधवार (ता. ५) पासून विनामास्क वावरणाऱ्या नागरिकांना दंड भरावा लागणार आहे. यासाठी आम्ही जनजागृती फेरी काढली. जनजागृती करण्यासाठी कार्यालयीन अधीक्षक परेश कुंभार, कर निरीक्षक नंदकुमार आंबेतकर, लेखापाल कपिल वेहेले, आरोग्य अधिकारी राकेश पाटील, नगर रचना सहायक साहिल मुजावर, प्रकाश आरेकर, सुदेश माळी, प्रशांत दिवेकर, अभिजित कारभारी, सतेज निमकर व सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT