मुंबई

लोणावळ्यात तासभर रोखला महामार्ग

CD

लोणावळा, ता. २० : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ व आयआरबीच्या हलगर्जीपणामुळे मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर वलवण ते खंडाळा दरम्यान वारंवार अपघात होतात. त्यामुळे अनेक निष्पाप नागरिकांचा बळी जात आहे.
अपघात रोखण्यासाठी तातडीच्या उपाययोजना कराव्यात या मागणीसाठी लोणावळा जागरूक नागरिकच्या वतीने रविवारी तासभर महामार्ग रोखून आंदोलन करण्यात आले.
यावेळी कुमार रिसॉर्टसमोरील आंदोलनात सर्वपक्षीय पुढाऱ्यांसह, सामाजिक संघटना, नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. यावेळी निषेधाच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या.
पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर लोणावळा परिसरात अपघाताचे प्रमाण वाढत आहे. वलवण ते खंडाळा परिसरातील विद्यार्थी, युवक, महिला बंधू भगिनींना आपला जीव धोक्यात घालून या मार्गावरून प्रवास करावा लागतो. लोणावळेकरांना या समस्येला सतत सामोरे जावे लागते. पंधरा दिवसांत महामार्गावर अपघातात दोन युवकांचा बळी गेला होता. तर अन्य एका अपघातात महिला गंभीर जखमी झाली होती. यापार्श्वभूमीवर मनःशक्ती ते खंडाळा रोडवर रस्ता दुभाजक व पथ दिव्यांची सोय करावी, अपघात स्थळांवर गतिरोधक बसवावेत, मनःशक्ती ते किरण पेट्रोल पंपादरम्यान रस्ता रुंदीकरण व्हावे, खंडाळा पोलिस प्रशिक्षण केंद्र ते नाझर कॉर्नर रस्ता सरळ करावा, वाहनांना लोणावळा व खंडाळ्यात प्रवेश बंदी करावी, खोपोली वरून राजमाची खंडाळा जुन्या रोड मार्गे येणारी अवजड वाहने बंद करावी, आदी मागण्या लोणावळा जागरूक नागरिकाच्या वतीने करण्यात आल्या.
रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता राकेश सोनवणे, तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी आंदोलनस्थळी भेट देत, लेखी हमी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऑनलाइन ग्रोसरी ऑर्डर करण्याआधी सावधान! Blinkit च्या फ्रीजरमध्ये जिवंत उंदीर आढळला; स्टोअरचा व्हिडिओ व्हायरल

पेपरमध्ये ढीगभर चुका, UGC-NET परीक्षेचे तीन पेपर पुन्हा होणार, तारीखही जाहीर...

Rohit Sharma: बाप रे बाप...! सायकलवरून हजारो किमीचा प्रवास करून आलेल्या फॅनला भेटल्यावर कशी होती रोहितची रिअ‍ॅक्शन, Viral Video

Phone Charging Tips: Airplane Mode ON करून फोन चार्ज केला तर काय होतं? जाणून घ्या

Shirur Bypass Crash: शिरूर बायपासवर पुन्हा बळी; तुटलेल्या दुभाजकातून दुचाकी नेणे जीवावर बेतले

SCROLL FOR NEXT