मुंबई

केशवराव ढोरे प्रतिष्ठानतर्फे २४ एप्रिलला विवाहसोहळा

CD

वडगाव मावळ, ता. २८ ः स्व. पै. केशवराव ढोरे प्रतिष्ठानच्यावतीने येत्या २४ एप्रिल रोजी सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. समितीच्या अध्यक्षपदी सुनील शिंदे यांची तर कार्यक्रमप्रमुखपदी अर्जुन ढोरे यांची निवड करण्यात आली.
प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंढरीनाथ ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली. राजेंद्र वहिले, विलास दंडेल, अरुण वाघमारे, विवेक गुरव, अतुल राऊत, गणेश विनोदे, अनिल कोद्रे, शंकर ढोरे, रोहिदास गराडे, काशिनाथ भालेराव आदी उपस्थित होते.
गेली दोन वर्षे कोरोना संकटामुळे सामुदायिक विवाह सोहळा होऊ शकला नाही. तसेच महागाईमुळे अडचणीत आलेले सर्वसामान्य नागरिक व सध्या पुन्हा सुरू झालेला लग्नाचा डामडौल या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य कुटुंबांना आधार मिळावा या उद्देशाने यावर्षी विवाह सोहळा करण्याचे निश्चित करण्यात आले.
यावर्षीचा सामुदायिक विवाह सोहळा २४ एप्रिल रोजी होणार असून, जोडप्यांना संपूर्ण पोशाख, संसारोपयोगी भांडी, वऱ्हाडी मंडळींची जेवणाची व्यवस्था, नवरदेवांची मिरवणूक आदींसह विवाह सोहळ्याचे नियोजन करण्यात आले आहे.
नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे :
अध्यक्ष - सुनील शिंदे, कार्यक्रमप्रमुख - अर्जुन ढोरे, उपाध्यक्ष - सदाशिव गाडे, सोमनाथ धोंगडे, सचिव - शरद ढोरे, सहसचिव - संजय दंडेल, खजिनदार - अनिल कोद्रे, सहखजिनदार - सुनील दंडेल.

03567

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

BJP President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी महिलेला संधी? निर्मला सीतारामन यांच्यासह 'या' नावांची होतेय चर्चा

Mumbai News: कबुतरांना खाद्य देण्यावर निर्बंध, तरीही लोकं ऐकेनात; आता पालिका राबवणार विशेष मोहीम

SCROLL FOR NEXT