Community wedding ceremony sakal media
मुंबई

रायगड : सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात; ७४ जोडपी अडकली विवाहबंधनात

सकाळ वृत्तसेवा

रसायनी : रसायनीतील वडगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीतील साईनगर, वाशिवलीवाडी येथे रविवारी (ता.२७) वनवासी कल्याण आश्रम आणि कॅप्री फाऊंडेशनच्या (capri foundation) वतीने सामुदायिक विवाह सोहळा (community wedding ceremony) घेण्यात आला. यामध्ये ७४ जोडपी विवाहबंधनात अडकली. कार्यक्रमाला वनवासी कल्याण आश्रमच्या कोकण प्रांतध्यक्षा ठमाताई पवार, कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड कंपनीचे संचालक राजेश शर्मा (rajesh sharma), ट्रस्टी कॅप्री फाऊंडेशनचे बेनी प्रसाद राउका, कंपनीच्या सीएसआर विभागाचे नीता जोशी, वडगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच गौरी गडगे, उपसरपंच सुजेता पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

खालापूर, कर्जत, पनवेल, पेण, उरण, अलिबाग तालुक्यातील बहुतेक आदिवासी वाड्यांतील रहिवाशांची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने त्यांच्यासाठी हा विवाह सोहळा घेण्यात आला. सर्व जोडप्यांना कपडे, गृहपयोगी वस्तू देण्यात आल्या आहेत. याशिवाय सर्व विवाह झालेल्या जोडप्यांना विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र देण्यात आली. कार्यक्रमास मोहोपाडा येथील व्यापारी आणि वाशिवली वाडीतील गजानन शंकर वाघमारे, वेणूताई गजानन वाघमारे यांचे विशेष सहकार्य लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिकेतील छेडछाड आता गुन्हा ठरणार

SCROLL FOR NEXT