Mumbai University Sakal media
मुंबई

मुंबई विद्यापीठ: पदवी व पदव्युत्तरच्या प्रथम सत्र उन्हाळी परीक्षा होणार ऑफलाईन

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या (Mumbai university) २०२२ च्या पदवी व पदव्युत्तरच्या प्रथम सत्र उन्हाळी परीक्षा ऑफलाईन (offline exam) आणि ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जाणार आहेत. त्यासाठी विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाने निर्णय घेतला आहे. दरम्यान, कोरोना आणि त्याबाबत पुन्हा काही परिस्थिती उद्भवल्यास या काही परीक्षा या ऑनलाईन (online) घेतल्या जातील, असेही विद्यापीठाने स्पष्ट केले असून त्यासाठी परिपत्रक लवकरच जाहीर केले जाणार आहे.

पदवीच्या कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या सत्र २ नियमित व बॅकलॉग परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येतील; तर सत्र १, ३ व ५ बॅकलॉगच्या परीक्षा आणि सत्र ४ ची नियमित व बॅकलॉग परीक्षा ऑनलाईन घेण्यात येईल. तसेच सत्र ६ च्या परीक्षेबाबत विद्यार्थ्यांच्या एकूण लसीकरणाची संख्या, तसेच कोकणातील एस.टी. महामंडळाच्या संपाची परिस्थिती व कोविडची परिस्थिती विचारात घेऊन १ मार्च २०२२ पर्यंत निर्णय घेण्यात येणार आहे.

कला, वाणिज्य व विज्ञान पदव्युत्तरच्या सत्र २ व ४ नियमित व बॅकलॉग परीक्षा ऑफलाईन, तर सत्र १ व ३ बॅकलॉगच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल. ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणाऱ्या कला, वाणिज्य व विज्ञान पदवी व पदव्युत्तर परीक्षा ५० टक्के बहुपर्यायी प्रश्न व ५० टक्के वर्णनात्मक प्रश्न या पद्धतीने घेण्यात येतील.

व्यावसायिक शाखांच्या परीक्षा ऑफलाईन

व्यवस्थापनशास्त्र शाखेच्या सत्र १ ते ४ नियमित व बॅकलॉग परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येतील. अभियांत्रिकी, फार्मसी, आर्किटेक्चर व एमसीए या वर्गाच्या सर्व परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येतील. शिक्षणशास्त्र पदवी परीक्षा सत्र २ व ४ परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येतील. केवळ सत्र १ व ३ बॅकलॉग या परीक्षा ऑनलाईन होतील. आंतर-विद्या शाखेतील उर्वरित परीक्षा, तसेच विधी शाखेच्या सर्व परीक्षा नियमित व बॅकलॉग या ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येतील.

मुंबई विद्यापीठाचे शैक्षणिक विभाग व उपपरिसर यांच्या परीक्षा या ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येतील. यात २०२२ च्या प्रथम सत्र उन्हाळी परीक्षेचे सविस्तर परिपत्रक परीक्षा विभागाकडून लवकरच निर्गमित करण्यात येईल.

- डॉ. विनोद पाटील, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडविरुद्ध विश्वविक्रमी शतक केल्यानंतर शुभमन गिलचं नाव घेत म्हणतोय, आता लक्ष्य २०० धावा; VIDEO

Crime News: "ऐका! आता मी शारीरिक संबंध ठेवणार नाही, माझ्या नवऱ्याला...", प्रियकर मानलाच नाही शेवटी असा धडा शिकवला की...

Thane Politics: पुलाचे घाईत उद्घाटन, चालकांचा जीव धोक्यात, गुन्हा दाखल करा; ठाकरे गट आक्रमक

संतापजनक घटना! 'फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून महिलेवर अत्याचार'; उरुळी कांचन पोलिसांकडून दोघांना अटक

Pune Accident: 'आषाढी एकादशी दिवशीच पती-पत्नीचा अपघाती मृत्यू'; वारीवरून परतत असताना काळाचा घाला, परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT