मुंबई

‘दलित पॅंथर’चा सुवर्ण महोत्सव राज्यभर साजरा करणार

CD

मुंबई, ता. १३ : दलित पॅंथरच्या स्थापनेला यंदा ९ जुलै रोजी ५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त संपूर्ण राज्यात दलित पॅंथरचा सुवर्णमहोत्सव साजरा करणार असल्याची घोषणा आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी वांद्रे येथील वोक्हार्ट हॉलमध्ये केली.

दलित पॅंथर सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त राज्यभरातील विचारवंत साहित्यिक आणि पॅंथर कार्यकर्त्यांच्या आज झालेल्या बैठकीत सर्व संमतीने दलित पॅंथर सुवर्णमहोत्सव समिती स्थापन करण्यात आली. ९ जुलै रोजी दलित पॅंथरचा सुवर्णमहोत्सव सोहळा साजरा करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार राज्यात उत्तर-पश्चिम महाराष्ट्र, कोकण, विदर्भ, मराठवाडा आदी सर्व विभागांत कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. दलित पॅंथरचे प्रमुख नेते-कार्यकर्ते यांचा सन्मानही करण्यात येणार आहे. दिवंगत पॅंथर कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांचा सन्मान दलित पॅंथर सुवर्णमहोत्सव समितीतर्फे करण्याचा निर्णयही घेण्यात आला. समग्र आंबेडकरी चळवळीच्या वतीने सर्वांना सोबत घेऊन सुवर्णमहोत्सव साजरा करण्यात येणार आहे.

दलित पॅंथर अन्यायाचा प्रतिकार करणारे ऐतिहासिक संघटन ठरले आहे. दलित पॅंथरमुळे प्रेरणा घेऊन देशभर दलितांसाठी अनेक संघटना निर्माण झाल्या. दलित पॅंथर ही तरुणांना अन्यायाचा प्रतिकार आणि न्यायासाठी लढा शिकवणारी प्रेरणादायी संघटना आहे. त्यामुळे अन्यायाविरुद्धच्या आक्रमकतेला आणि दलित तरुणांमधील लढाऊ वृत्तीला प्रेरणा देत राहावे यासाठी ऐतिहासिक ठरलेल्या दलित पॅंथरचा सुवर्णमहोत्सव साजरा करणे आम्हाला महत्त्वाचे वाटते, असे आठवले म्हणाले.

अविनाश महातेकर, अर्जुन डांगळे, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, बबन कांबळे, राही भिडे, दिलीप जगताप, गौतम सोनवणे, प्रेम गोहिल, सुरेश सावंत, विजय साबळे आदी अनेक मान्यवर बैठकीला उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लाडक्या बहिणींना ३००० मिळणार की ४५००? तीन महिन्यांच्या हप्त्यांबाबत पुढच्या काही तासात होणार निर्णय?

Latest Marathi News Live Update : रत्नागिरी जिल्ह्यात अंगारकी संकष्टीनिमित्त गणपतीपुळे मंदिरात भाविकांची गर्दी

IPL Delhi vs Chennai News: दिल्लीचा संघ घरच्या मैदानावर दैव बदलणार?; धोनी नसला तरी चेन्नईचा आत्मविश्वास उंचावलेला

Akola News: टॅंकरवर वाढली शहराची निर्भरता; चारही झोनमध्ये दिवसाला १६ ते १८ टॅंकरच्या फेऱ्या

Akola News: जिल्ह्यातील ४० अधिकृत केंद्रांबाहेरील सोनोग्राफी बेकायदेशीर;नागरिकांना सतर्कतेचे आवाहन; अवैध तपासणीबाबत माहिती दिल्यास एक लाखांचे बक्षीस

SCROLL FOR NEXT