मुंबई

फेब्रुवारीच्या २६ दिवसांत सात वेळा शून्य मृत्यू

CD

मुंबई, ता. २८ : मुंबई आता कोरोनामुक्तीच्या मार्गावर आहे. कमी होत असलेला पाॅझिटिव्हिटी दर आणि सतत शून्य मृत्यूंची नोंद यावरून हे स्पष्ट होते. शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी कोरोनामुळे शून्य मृत्यूची नोंद झाली. कोविडच्या तिसऱ्या लाटेत फेब्रुवारी महिन्यात २६ दिवसांत सातव्यांदा कोविडमुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. यासह मुंबईतील नवीन रुग्णांची संख्या दोन अंकी झाली आहे.
पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी सांगितले की, नवीन रुग्णांच्या घटत्या संख्येमुळे मुंबईचा पाॅझिटिव्हिटी दर ०.४ टक्क्यांवर पोहोचला आहे. दुसऱ्या लाटेत डिसेंबर महिन्यात मुंबईत सात वेळा शून्य मृत्यू झाले होते. आता तिसऱ्या लाटेतही हाच ट्रेंड दिसून येत आहे. यासह २३ महिन्यांनंतर शनिवारी मुंबईत इतके कमी रुग्ण आढळले आहेत.
अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की, तिसऱ्या लाटेत आठव्यांदा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. तिसऱ्या लाटेत २ जानेवारी २०२२ रोजी कोरोनामुळे एकही मृत्यू झाला नाही आणि आता १५, १६, १७, २०, २३, २५ आणि २६ फेब्रुवारी रोजी शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.

६५०० बेड काढणार...
जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारीमध्ये कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या ५४ टक्क्यांनी कमी झाली आहे. पालिका आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, नवीन रुग्णांची संख्या कमी असल्याने चार जम्बो कोविड केंद्र बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे कोविड रुग्णांसाठी राखीव बेडमधून सुमारे ६,५०० बेड काढण्यात येणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Main Exam 2026 Postponed : MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! 3 ऑक्टोबरपासून होणाऱ्या तीन महत्त्वाच्या मुख्य परीक्षा ढकलल्या पुढे; आयोग लवकरच जाहीर करणार नव्या तारखा

Jammu-Kashmir Assembly: जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा? विधानसभेत ठराव मंजूर, भाजपचा सभात्याग! काय बदल होणार?

Ladki Bahin Yojana ₹1500 Installment : लाडक्या बहिणींच्या खात्यात 3000 ऐवजी किती पैसे जमा झाले? घरबसल्या मोबाईलवर मिनिटांत तपासा रक्कम; कशी पाहाल स्टेटस?

Latest Marathi News Live Update: ९० कोटींच्या निविदेसाठी आयुक्तांना धमकी

Udaipur ₹2 Crore Bribery Case : एसीबीच्या जाळ्यात सापडला मोठा मासा? तब्बल 2 कोटी रुपयांची घेतली लाच; एसओजी अधिकाऱ्याच्या नावाने पैसे घेणारा दलाल जाळ्यात

SCROLL FOR NEXT