मुंबई

गिरणी कामगारांची सोडत रखडली

CD

मुंबई, ता. ४ : एमएमआरडीएच्या घरांची सोडत काढण्याची मागणी गिरणी कामगार संघटनांकडून झाल्याने म्हाडाने त्यासाठीची तयारी केली होती. मात्र, एमएमआरडीएकडून घरे प्राप्त न झाल्याने गिरणी कामगारांची सोडत लांबणीवर गेली आहे. एमएमआरडीएकडून घरांची माहिती मिळताच सोडत काढण्यात येणार आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) पनवेल कोन येथील भाडेतत्त्वावरील योजनेसाठी उभारलेली घरे गिरणी कामगारांना देण्याचा निर्णय सरकारने घेतल्यानंतर म्हाडामार्फत २०१६ मध्ये २ हजार ४१७ घरांची सोडत काढण्यात आली. सोडतीनंतर म्हाडाने काही पात्र कामगारांकडून घराची संपूर्ण रक्कम घेतली आहे. मात्र, घराचा ताबा अद्याप रहिवाशांना मिळालेला नाही. यातच या सोडतीमध्ये विजेते ठरलेल्यांना मुंबईत घर देण्याची घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली होती. मात्र, त्यांनी गृहनिर्माण मंत्र्यांची भेट घेऊन घराची रक्कम भरलेल्या कामगारांना घरे देण्याची मागणी केली होती. त्यानुसार पुन्हा कामगारांना पनवेल येथील घरे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

म्हाडा उपाध्यक्षांनी सोडत काढण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. मात्र, या सोडतीसाठी आवश्यक असलेली घरांची माहिती एमएमआरडीएकडून मिळालेली नाही. त्यामुळे म्हाडाला सोडत काढता आली नाही. एमएमआरडीएकडून घरे प्राप्त होताच सोडत काढण्यात येईल, असे म्हाडातील सूत्रांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana Violence : बुलढाण्यात २ गटात राडा! तलवार अन् शस्त्रांनी वार; शिवसेना नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, ७ जण जखमी

Leopard : दुष्काळात तेरावा महिना, भेंडाळा शिवारात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच; पिंजरा लावण्याची मागणी

Phulambri News : तावडे केणेकरांच्या घरी, चव्हाण भाजप कार्यालयात..! पदवीधरच्या राजकारणात नेमके चाललेय तरी काय?

Mangalwedha News : दिल्लीच्या सीमेवर पंढरपूर मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना रोखले; गनिमी पद्धतीने जंतर-मंतरवर धडक, मागण्यांसाठी आंदोलन

भारत-अमेरिका व्यापार कराराची चर्चा ठप्प! अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT