मुंबई

रखडलेल्या सीसीटीव्हीच्या कामाचा खुलासा करा

CD

मुंबई, ता. ७ : राज्यातील पोलिस ठाण्यात सीसी टीव्ही कॅमेरे लावण्याचे कंत्राट मिळालेल्या दोन कंत्राटदारांना शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात हजर राहण्याचे आदेश आज खंडपीठाने दिले आहेत. बावीस आठवड्यांत कॅमेरा लावण्याची अट असताना कामाला विलंब का झाला याचा खुलासा करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

पुण्यातील सुजाता कम्प्युटर प्रा. लि. आणि बंगळूरमधील जावी सिस्टीम प्रा. लि. यांना मागील वर्षी ऑगस्टमध्ये सीसी टीव्ही कॅमेरे लावण्याचे काम राज्य सरकारने दिले होते. यामध्ये पुढील पाच वर्षे सीसी टीव्ही देखभाल आणि दुरुस्तीही आहे. सुमारे १०८९ पोलिस ठाण्यांपैकी ५४७ पोलिस ठाण्यात ६ हजार ९२ कॅमेरे बसविण्यात आले आहेत, असे सरकारने सांगतले. यापैकी ५ हजार ३९ कॅमेरे सुरू असून ४५३ बंद आहेत. तसेच उर्वरित ५४२ पोलिस ठाण्यात सीसी टीव्ही लावण्याची यंत्रणा उभारण्यात आली आहे. राज्य सरकारने पोलिस ठाण्यात सीसी टीव्ही लावण्यासाठी साठ कोटी रुपये मंजूर केले असून २३ कोटी कंत्राटदारांना दिले आहेत. राज्य सरकारने प्रतिज्ञापत्रात ही माहिती दिली. आज अमायकस क्युरी (न्यायालयाचे मार्गदर्शक) म्हणून नियुक्त केलेले ॲड. रोहन कामा यांनी न्या. शाहरुख काथावाला आणि न्या. मिलिंद जाधव यांच्या खंडपीठाला माहिती दिली. यानुसार सध्या ७११ सीसी टीव्ही बंद आहेत.

न्यायालयाचा टोला
सरकारी वकील श्रुती व्यास यांनी खुलासा करत सीसी टीव्हीच्या कामाची माहिती दिली. मग अद्याप काम का झाले नाही, याचा खुलासा कंत्राटदारांनी सुनावणीला हजर राहून करावा, असे निर्देश खंडपीठाने दिले. कंत्राटदारांना कामाचे तेवीस कोटी यापूर्वी मिळाले आहेत, त्यामुळे मुंबईची एक फेरी करणे त्यांना शक्य आहे, असा टोला खंडपीठाने लगावला. शुक्रवारी यावर सुनावणी होईल. देशातील सर्व पोलिस ठाण्यांत सीसी टीव्ही कॅमेरे लावण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या पार्श्‍वभूमीवर उच्च न्यायालयाने याबाबत निर्देश दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CGHS नियमांमध्ये मोठा बदल! आता आई-वडील किंवा सासू-सासरे यांच्यापैकी एकालाच मेडिकल लाभ मिळणार; नवा नियम लागू

PBKS vs MI Live : शार्दूल ठाकूरची 'स्टम्प' तोड गोलंदाजी! पंजाबने ३३ धावांत गमावले ६ फलंदाज; 'लॉर्ड'च्या ४ विकेट्सने फिरली मॅच Video

Latest Marathi News Live Update : इंधन बचतीचे धडे जनतेला, पण महिला हक्क समितीचा दिंडोरी दौरा ताफ्यामुळे चर्चेत

PBKS vs MI Live : १४ चेंडूंत ४ विकेट्स! शार्दूल ठाकूरचा भन्नाट मारा... श्रेयस अय्यर आला तसा गेला, जसप्रीतचा डाव यशस्वी; Video

Pune News : नदी काठ सुधारसाठी मिळाली ५२ हजार चौरस मिटर जागा; राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय

SCROLL FOR NEXT