sudhir mungantiwar  sakal media
मुंबई

एसटी संपावर तोडगा काढा! सुधीर मुनगंटीवार यांची मागणी

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्यात गेल्या पाच महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप (ST workers strike) सुरू आहे. राज्य सरकारने (Maharashtra Government) पक्षीय राजकारण आणि राजकीय अभिनिवेश बाजूला सारून संपावर तातडीने तोडगा काढावा आणि महाराष्ट्राच्या जीवनवाहिनीला (Maharashtra lifeline) पुन्हा गती द्यावी, अशी मागणी विधिमंडळ लोकलेखा समितीचे अध्यक्ष आमदार (sudhir mungantiwar) सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

राज्यात २९ ऑक्टोबरपासून सुरू झालेला एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर अद्याप तोडगा निघाला नाही. आतापर्यंत ४५ एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या. जळगाव जिल्ह्यातील यावल आगाराच्या शिवाजी पाटील या चालकाने रेल्वेखाली आत्महत्या केली. ही घटना हृदय हेलावणारी आहे. संपामुळे ६२ ते ६५ हजार एसटी कर्मचाऱ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे तसेच एसटी महामंडळाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

नियमित बससेवा नसल्याने ऐन परीक्षेच्या काळात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागत आहे. एकूणच महाराष्ट्रातील सर्वसामान्य, गोरगरीब जनता त्यामुळे वेठीस धरली गेली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने तातडीने या मुद्द्यावर तोडगा काढावा, अशी मागणी मुनगंटीवार यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonia Gandhi: संपूर्ण 'वंदे मातरम्' गायनावर सोनिया गांधींनी खरंच आक्षेप घेतला होता का? नेमकं काय घडलं? काँग्रेसचं स्पष्टीकरण

Central Railway: कर्जत-खोपोली प्रवास आरामदायी होणार, १५ डब्यांच्या लोकल धावणार, मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; पाहा वेळापत्रक

Kailas Patil : ‘ऑपरेशन टायगर’चा दुसरा भाग? कैलास पाटील शिंदे गटात जाणार?

अभिजीत खांडकेकरची मेहुणी आहे ही मराठी अभिनेत्री; गाजवतेय मालिका; म्हणते- माझ्या लग्नात त्यांनी खुर्च्या उचलल्यात...

Marathi News Live Updates : आज स्वातंत्र्यदिनी अमृतसरमधील अटारी-वाघा सीमेवर 'बीटिंग रिट्रीट' समारंभ पार पडला

SCROLL FOR NEXT