मुंबई

एनसीबीकडून आरोपपत्र दाखल करण्यासाठी मुदतवाढीची मागणी

CD

आर्यन खान प्रकरण ः

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : आर्यन खान विरोधातील अमलीपदार्थ प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यासाठी आणखी नव्वद दिवसांची मुदतवाढ देण्याची मागणी करणारा अर्ज एनसीबीने विशेष एनडीपीएस न्यायालयात केला आहे. बुधवारी विशेष न्यायालयात यावर एनडीपीएसच्या वतीने युक्तिवाद करण्यात आला. एनडीपीएस कायद्यातील कलम ३६ अ (४) प्रमाणे १८० दिवस पूर्ण होण्यापूर्वी ही मुदतवाढ मागण्यात आली आहे.

नियमित कालावधीनुसार येत्या शनिवारी ही मुदत संपणार आहे. याप्रकरणी एनसीबीने आर्यन खानसह एकूण २० आरोपींना अटक केली होती. यापैकी अटक झालेले दोन परदेशी नागरिक अद्याप कारागृहामध्येच आहेत. एनसीबीच्या अर्जावर विशेष न्यायालय गुरुवारी फैसला सुनावणार आहे. तपासयंत्रणेने याप्रकरणी जमा केलेले सर्व नमुने तपासणीसाठी पुण्याच्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. ते सर्व १७ नमुने सायकोट्रॉपिक ड्रग चाचणीत पॉझिटिव्ह आले आहेत, आतापर्यंत एकूण ६९ साक्षीदारांचा जबाब नोंदविण्यात आला आहे. १० स्वतंत्र साक्षीदारांचा जवाब ही नोंदविला गेला असून अन्य ४ जणांचा जबाब नोंदवणे बाकी आहे. याशिवाय अन्य १५ संशयितांची चौकशी सुरू आहे. त्यामुळे आरोपपत्रासाठी ९० दिवसांची मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी एनसीबीतर्फे करण्यात आली आहे. आर्यन विरोधात एनसीबीने गंभीर आरोप केले आहेत. त्याला उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DC vs GT Live: गुजरात टायटन्सने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकली! KL Rahul चे शतक हुकलं अन् डेव्हिड मिलरचे प्रयत्नही फसले, दिल्ली कॅपिटल्स १ धावेने हरले

IPL 2026 : खळबळ!दिल्ली-गुजरात मॅच सुरू अन् अरुण जेटली स्टेडियमच्या गेटजवळ सापडली संशयास्पद बॅग, यंत्रणा सतर्क; काय होत त्यात?

बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी आहे का? तिसऱ्या महायुद्धाबद्दल काय केलं होतं भाकित? खरं काय जाणून घ्या

Pune Metro: बोअरवेल घेताना भूमिगत मेट्रोच्या बोगद्याला पाडलं छिद्र; पुणे कोर्टाने घरमालकाचा अटकपूर्व जामीन फेटाळला

भारतीय राजकारणात मोठा बदल! संसद आणि विधानसभांमध्ये महिलांना ३३% आरक्षण लागू होणार? विधेयकाला मोदी कॅबिनेटची मंजुरी

SCROLL FOR NEXT