महाविद्यालयांचे नामफलक मराठीत जळकणार sakal
मुंबई

महाविद्यालयांचे नामफलक मराठीत जळकणार

सर्व महाविद्यालयांचे नामफलक आता मराठीतून झळकणार असून महाविद्यालयांत मराठीला अधिकाधिक स्थान मिळावे यासाठी प्रयत्न केले जातील

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : महाविकास आघाडी सरकारने नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यातील स्थानिक प्राधिकरण, आस्थापने, शैक्षणिक संस्था यांच्या शासकीय प्रयोजनासाठी मराठी भाषेचा वापर करण्याकरिता विधेयक संमत केले होते. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी मुंबई विद्यापीठाने आपल्या अंतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयांचे नामफलक मराठीतून लावण्याचे आदेश जारी केले आहेत. यामुळे सर्व महाविद्यालयांचे नामफलक आता मराठीतून झळकणार असून महाविद्यालयांत मराठीला अधिकाधिक स्थान मिळावे यासाठी प्रयत्न केले जातील.

मराठी भाषेला अभिजात दर्जा बहाल करण्यासाठी मराठी भाषा विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. त्याच पार्श्वभूमीवर सरकारने स्थानिक प्राधिकरण राजभाषा विधेयक आणून ते मंजूर केले. त्यामुळे विद्यापीठातील युवा सेनेच्या सिनेट सदस्यांनी विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयातील नामफलक हे मराठीतून लावण्याची मागणी लावून धरली होती. त्यासाठी विद्यापीठाच्या सिनेटमध्ये विद्यापीठ व त्या अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांमध्ये मराठीला अधिकाधिक स्थान मिळावे, मराठीचा अधिकाधिक वापर व्हावा, यासाठी विशेष प्रयत्न केले पाहिजे, अशा प्रकारचा स्थगन प्रस्ताव युवा सेनेच्या वतीने शीतल देवरुखकर शेठ यांनी मांडला होता. त्यावर शुक्रवारी कुलसचिव सुधीर पुराणिक यांनी यासंदर्भातील परिपत्रक जाहीर केले आहे. या परिपत्रकाचे युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत, राजन कोळंबेकर, महादेव जगताप, शशिकांत झोरे, डॉ. धनराज कोहचाडे आणि शीतल शेठ देवरुखकर आदींनी स्वागत केले.

विद्यापीठाच्या सूचना...
- महाविद्यालयांच्या पत्रव्यवहारात प्राधान्याने मराठी भाषा वापरावी.
- महाविद्यालयांच्या सूचना मराठीतून लिहाव्या.
- महाविद्यालयाचे नाव दर्शनी भागात मराठी भाषेत असावेत. सहज नजरेस पडेल अशा पद्धतीने लावले जावे.
- महाविद्यालयाचे माहितीपुस्तक, प्रवेश अर्जही मराठीत उपलब्ध करून द्यावे.
- कार्यशाळांमध्ये मराठीचा वापर करावा.
- मराठी भाषा दिवस २७ फेब्रुवारी रोजी साजरा करावा. यानिमित्त चर्चा सत्रे, स्पर्धांचे आयोजन करावे. त्याची माहिती विद्यापीठाकडे सादर करावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२ ऑक्टोबरला मोठं आंदोलन, पण त्याआधीच CJPला मोठा धक्का; प्रमुख नेत्याला डेंग्यू

Ramesh Mhatre: रमेश म्हात्रेंना सुप्रीम कोर्टाचा झटका! डॉक्टर मारहाण प्रकरणात जामीन रद्द, पुन्हा कोठडीत रवानगी

UPI MDR Update: UPI MDR शुल्काला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; काय म्हणाले कोर्ट?

'गारंबीचा बापू' आला रे! कोकणच्या मातीतील बंडखोर कहाणी आता मोठ्या पडद्यावर; 'हा' अभिनेता साकारणार भूमिका

World Rabies Day 2026: कुत्रा चावला नाही तरी रेबीजचा धोका? 'हे' गैरसमज आजच दूर करा!

SCROLL FOR NEXT