मुंबई

पेट्रोल, डिझेल दरवाढ कायम

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ ः गेल्या १२ दिवसांत दहा वेळा इंधनाची दरवाढ झाली आहे. शुक्रवारी इंधनाचे दर स्थिर राहिल्यानंतर शनिवारी (ता. २) पुन्हा मुंबईत पेट्रोल, डिझेल सरासरी ८५ पैशांनी महागले. त्यामुळे मुंबईत पेट्रोल ११७.५७, तर डिझेल १०१.७९ रुपये प्रतिलिटर दराची नोंद झाली आहे. नांदेड, परभणी जिल्ह्यांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दराचा भडका उडाला आहे.

गेल्या दहा दिवसांत पेट्रोल ७.५९, तर डिझेल ७.६५ रुपयांनी वाढले आहे. परिणामी सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. आधीच गेल्या दोन वर्षांत कोरोनाच्या महामारीत अनेक जण बेरोजगार झाले आहेत; तर काहींना अद्याप रोजगार मिळेनासा झाला आहे. अशा परिस्थितीत सध्या जीवनावश्यक वस्तूंसह इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांवर दुहेरी संकट निर्माण झाले आहे.
---
सातत्याने सुरू असलेल्या इंधनदरवाढीमुळे सर्वसामान्य होरपळत आहेत. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या दरात वाढ होत असताना केंद्र आणि राज्य सरकार त्यामध्ये आपला फायदा करून घेत आहे. दर वाढले की कर सुद्धा वाढवत आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य या दोन्ही सरकारांनी मूल्यांवर आधारित कर लावण्याची प्रक्रिया सुधारून प्रतिलिटर इंधन दरावर कर लावावा.
- शिरीष देशपांडे, कार्याध्यक्ष, मुंबई ग्राहक पंचायत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सोनम वांगचुक यांची सुटका होणार, गृहमंत्रालयाकडून आदेश जारी; 'रासुका'वरही केंद्राचा युटर्न

मालिकेत एकमेकांच्या तालावर नाचणाऱ्या सायली आणि प्रियाने चक्क कोळीगीतावर लगावले ठुमके; व्हिडिओ व्हायरल

Gas Cylinder Scam : ‘LPG सिलेंडर हवा आहे का?’ अशा प्रकारच्या 'या' 5 व्हॉट्सॲप मेसेजपासून सावध; एका क्लिकने बँक खाते होऊ शकते रिकामे

Latest Marathi News Live Update : जिल्हा रुग्णालयाच्या कॅन्टीनमध्ये घरगुती गॅसचा वापर

मी खिलाडूवृत्ती दाखवली असती! Run Out वर सलमान अली आघाची प्रतिक्रिया; सचिनला बाद केले तेव्हा विसरलेले sportsmanship

SCROLL FOR NEXT