sakal media
मुंबई

मच्छीमार असल्याचा दाखला तहसीलदारांकडून घ्यावा लागणार

CD

मुंबई, ता. ७ : मासेविक्रेत्या कोळी समाजाला माशांची विक्री करण्याच्या दाखल्यासाठी तहसीलदारांकडून प्रमाणपत्र घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे मासळी विक्रेता असल्याचा दाखला आता मत्स्यव्यवसाय विभागाऐवजी तहसीलदार कार्यालयाकडून देण्यात येणार आहे. मात्र, या आदेशाला मच्छीमार समितीने आक्षेप घेतला असून अशी अट मागे घेण्याची मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री, प्रधान सचिव आणि मत्स्यव्यवसाय मंत्र्यांकडे करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्यात तीन-चार वर्षांपासून अनेक चक्रीवादळांमुळे मच्छीमारांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सोसावे लागले आहे. शासनाकडून वेळोवेळी नुकसानभरपाईचे आर्थिक पॅकेज मच्छीमारांना देण्यात आले आहेत. अनेक अटी-शर्तीची पूर्तता केल्यानंतर मच्छीमारांच्या खात्यात नुकसानभरपाईची रक्कम वळती केली जाते. त्यासाठी मच्छीमार असल्याचा पुरावा द्यावा लागतो. मत्स्यव्यवसाय विभागाकडे राज्यातील नौका मालकांच्या यादीची नोंद असल्याने मासेमारी करणाऱ्यांना अटींची पूर्तता करणे सोपे होते; परंतु मासेविक्रेत्या महिलांची आकडेवारी मत्स्यव्यवसाय विभागाकडे नसल्याने त्यांना अट पूर्ण करणे अशक्य होत आहे, असे अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष
देवेंद्र तांडेल यांनी सांगितले. चुकीचा आणि जबाबदारीपासून स्वतःला मुक्त करण्याचा अन्यायकारक निर्णय मत्स्यव्यवसाय सचिवांकडून घेण्यात आला असल्याचेही तांडेल यांचे म्हणणे आहे.

आर्थिक भरपाई देण्याची मागणी
कोळी महिलांना नुकसानभरपाईचे पॅकेज देताना शीतपेट्या घेण्याच्या बंधनकारक निर्णयाच्या विरोधातसुद्धा समितीकडून हरकत नोंदविण्यात आली आहे. मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना देण्यात येणाऱ्या आर्थिक भरपाईच्या धर्तीवर मासे विक्रेत्या कोळी महिलांनासुद्धा आर्थिक भरपाई देण्याची मागणी सदर निवेदनामधून शासनाला करण्यात आली आहे, अशी माहिती देवेंद्र तांडेल यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Cabinet Reshuffle : १२ मंत्र्यांना हटवले होते; मोदी सरकारचा शेवटचा मंत्रिमंडळ फेरबदल कधी झाला होता? आता दिग्गजांची गच्छंती?

IND vs ENG 1st T20I: वैभव सूर्यवंशीची सोशल मीडियावर हवा! श्रेयस अय्यर म्हणतो, मला ती दिसत नाही, कारण...; विधानाची जोरदार चर्चा

विहानला खेळायला जायचंय, तो येईल; बसवर झाड कोसळून मुलाचा मृत्यू, आई पाहतेय वाट, घरासमोरच घडली दुर्घटना

Petrol-Diesel Price: पेट्रोल 5 रुपये, डिझेल 3 रुपये स्वस्त! जुलैच्या पहिल्याच दिवशी मोठा दिलासा; 2 वर्षांनंतर पहिली दरकपात

MPSC Exam : ‘एमपीएससी’च्या परीक्षा आता होणार संगणकाधारित; भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी निर्णय

SCROLL FOR NEXT