मुंबई

बेस्टचे मोबाईल देयक भरणा केंद्र सेवेत

CD

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ७ : बेस्टच्या वीज ग्राहकांना वीज देयकांचा भरणा सुलभ रीतीने करण्याच्या दृष्टीने ‘बीबीपीएस’ प्रणालीचा वापर करून मोबाईल देयक भरणा केंद्र सुरू करण्यात आले. मोबाईल व्हॅनमध्ये सुरू करण्याच आलेल्या या केंद्राचे लोकार्पण गुरुवारी कुलाबा आगार येथे बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांच्या हस्ते करण्यात आले. ही प्रणाली राष्ट्रीय देयक महामंडळाद्वारे (एनपीसीआय) डिजिटल इंडिया इनिशिएटिव्ह अंतर्गत ‘एक्स पे’ या संस्थेच्या मदतीने सुरू करण्यात आली आहे.
वीज देयकांव्यतिरिक्त पाणी, मालमत्ता तसेच इतर महापालिका सेवा कर, फास्टटॅग रिचार्ज, गॅस, डीटीएच, क्रेडिट कार्ड, शैक्षणिक शुल्क, दूरध्वनी, भ्रमणध्वनी, केबल तसेच ब्रॉडबॅंडचे बिल बेस्टने सुरू केलेल्या मोबाईल व्हॅनद्वारे भरता येऊ शकते. अशी सेवा पुरविणारी बेस्ट ही भारतातील एकमेव संस्था असून देशामध्ये ही सेवा सर्वप्रथम बेस्ट उपक्रमाद्वारे सुरू करण्यात आल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. लवकरच अशा आणखी चार मोबाईल व्हॅनद्वारे सदर सेवेचा विस्तार करण्यात येणार आहे. ही मोबाईल व्हॅन वरळी, अँटॉप हिल, शिवाजी पार्क, रे रोड, नायगाव भोईवाडा, कफ परेड, नाना चौक आणि कुलाबा येथील गीतानगर या ठिकाणी कार्यरत राहील. याप्रसंगी एनपीसीआय संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नुपूर चतुर्वेदी, एक्स संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहित कुमार उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shendurwada News : सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश! शेंदूरवाड्यात १० केव्हीचा नवीन ट्रान्सफॉर्मर सुरू; शेतकऱ्यांना आता आठ तास वीजपुरवठा मिळण्याचा मार्ग मोकळा

Rafale Marine : भारतीय नौदलाच्या हवाई सामर्थ्यात भर! आयएनएस विक्रांतवर राफेल मरीनचे यशस्वी लँडिंग

Marathi News Live Updates : समृद्धी महामार्गावर हेक्टरी एक लाख रुपये भरपाईसाठी आंदोलन करणारे आमदार नितीन देशमुखांना पोलिसांनी घेतले ताब्यात!

RO-KO ची न्यूझीलंडमध्ये जोरदार तयारी! BCCI ने विराट-रोहितचा शेअर केला खास Video; कधी सुरू होणार वनडे मालिका?

Amit Shah: संसदेत होणार 'आर-पार'ची लढाई! 'मत चोरी'च्या मुद्द्यावरुन अमित शाहांचं राहुल गांधींसह अखिलेश यादवांना आव्हान

SCROLL FOR NEXT