मुंबई

पालिकेत ''केबल मॅन'' आणि ''एम ताई''ची चर्चा

CD

पालिकेत ‘केबल मॅन’ आणि ‘एम ताई’ची चर्चा

मुंबई, ता. ७ : स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या ‘मातोश्री’ प्रकरणानंतर गुरुवारी ‘एम ताई’ कोण, याबाबत दबक्या आवाजात चर्चा सुरू होती. आयकर विभागामार्फत जाधव यांची चौकशी सुरू असून त्यात ‘केबल मॅन’ आणि ‘एम ताई’ला पैसे दिल्याची नोंद केल्याची माहिती समोर आली आहे.
जाधव यांच्या चौकशीत त्यांच्या डायरीत ‘केबल मॅन’ला चार टप्प्यांत सव्वा कोटी रुपये दिल्याच्या नोंदी आहेत. ‘एम ताई’ला ५० लाख रुपये दिल्याची नोंद काही कागदांवर सापडल्याचेही समोर आले आहे. सध्या पालिकेत त्याचीच चर्चा असून ‘केबल मॅन’ आणि ‘एम ताई’ नक्की कोण, याबाबत तर्कवितर्क लावले जातात आहेत.
‘केबल मॅन’ म्हणजे परिवहन मंत्री अनिल परब आणि ‘एम ताई’ म्हणजे महापौर किशोरी पेडणेकर असल्याची दबकी चर्चा सुरू आहे. यापूर्वी यशवंत जाधव यांच्या डायरीमध्ये ‘मातोश्री’ला दोन कोटी आणि ५० लाख रुपये दिल्याची नोंद सापडली होती. आता पुन्हा एकदा नवीन नोंदी सापडल्याने त्याचीच चर्चा पालिका वर्तुळात रंगली आहे. त्याबाबत यशवंत जाधव यांच्याशी संपर्क केला असता तो होऊ शकला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: संतांची भूमी आणि भोंदूंचा उच्छाद; अशोक खरातसारख्या नीचला राजकीय आश्रय? पोस्टमधून राज ठाकरेंचा संताप, काय म्हणाले?

Video : "पुढच्या जन्मी कॉर्पोरेट कामगार बनवू नको रे देवा"..धुरंधर-2 पाहत-पाहत लॅपटॉपवर ‘वर्क फ्रॉम थिएटर’! महिलेचा व्हिडिओ व्हायरल

Maharashtra fishing News: मच्छीमारांवर एक लाख रुपयांचा अतिरिक्त भार; डिझेल दरवाढीचा परिणाम, बोटी किनाऱ्यावरच उभ्या करण्याचा निर्णय!

Latest Marathi News Live Update : गॅसटंचाईवर पीएम मोदींचं संसदेत वक्तव्य; युद्धामुळे इंधन पुरवठ्यावर परिणाम

Dharashiv News: अवकाळीचा ७१ गावांना फटका, ९९८ हेक्टर रब्बी, ४०९ हेक्टरवरील फळपिकांचे नुकसान; दीड हजार हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त

SCROLL FOR NEXT