प्रवीण दरेकर esakal
मुंबई

प्रवीण दरेकर यांना अटकपूर्व जामीन मंजूर

निवडणुकीतील बोगस मजूरप्रकरणी प्रवीण दरेकर यांना मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबई सहकारी बँक निवडणुकीतील बोगस मजूरप्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना मुंबई उच्च न्यायालयाने आज अटकपूर्व जामीन मंजूर केला.
आपचे नेते धनंजय शिंदे यांनी त्‍यांच्‍याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये अटक होण्याच्या शक्यतेने दरेकर यांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. आज न्या. अनुजा प्रभुदेसाई यांच्यापुढे यावर सुनावणी झाली. संबंधित प्रकरणाचा तपास एवढी वर्षे सुरू आहे, त्यामुळे आता पोलिस ताबा घेण्‍याची आवश्यकता नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच चौकशी करताना पोलिसांकडून अटकेची कारवाई झाल्यास ५० हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर सुटका करावी, असे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.

राज्य सरकारच्या वतीने याचिकेला तीव्र विरोध केला. या प्रकरणात बोगस कागदपत्रे सादर करण्यात आली होती, तसेच जर ते मजूर होते तर त्यांच्याकडे एवढी कोट्यवधी मालमत्ता कशी जमा झाली याचा तपास करायचा आहे, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. तसेच दरेकर सहकार्य करत नाहीत, जुनी कागदपत्रे देत नाहीत, असे ॲड. सुदीप पासबोला म्हणाले; मात्र एवढी जुनी कागदपत्रे न्यायालयातही मिळू शकणार नाहीत, असा शेरा न्यायालयाने मारला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT