मुंबई

कोलंबिया विद्यापीठातही महामानवाला अभिवादन

CD

मुंबई, ता. १३ : अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात पहिल्यांदाच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती साजरी केली जाणार आहे. विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी जगभरात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आंबेडकरवादी मान्यवरांची व्याख्याने आयोजित केली आहेत. तसेच डॉ. सुनील अभिमान अवचार यांचे In The Shadows of Emancipation’ यांचे चित्रप्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले आहे.
डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी उद्या (ता. १४) भारतीय वेळेनुसार रात्री १०.३० वाजता कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. कार्यक्रमात प्रो. जेनिक रॅडोन, प्रसिद्ध साहित्यिक ज. वि. पवार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू सुजात आंबेडकर आदी मान्यवर आपले विचार मांडणार आहेत. ऑनलाईन पद्धतीने होणाऱ्या या कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांबाबत विस्तृत चर्चा केली जाणार आहे. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेमॅन्स लायब्ररीमधील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून तसेच सद्धम्म प्रचार केंद्राचे सुधीर वानखडे यांच्या हस्ते बौद्ध वंदना घेऊन होणार आहे. तसेच अमरावतीच्या विपीन तातड याचा लाईव्ह रॅप शोदेखील होणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI व्यवहारांवर द्यावे लागणार शुल्क; नीती आयोगाच्या उपाध्यक्षांचे संकेत, कारणही सांगितलं...

Karmad News : उघड्या लिफ्टमधून बियाण्याची पोती नेताना तरुणाचा मृत्यू; कंपनी मॅनेजर, एचआर अधिकारी व कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा

Delhi Police IPS Transfers : दिल्ली पोलिस दलात मोठा फेरबदल; 5 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे नियुक्ती? पाहा बदल्यांची यादी

Bogus Doctor Crime : वारजे, खराडीत बोगस डॉक्टरांवर कारवाई; मनपाच्या बोगस वैद्यकीय व्यावसायिक शोध समितीची कारवाई

Latest Marathi News Live Update : मनमाड रेल्वे स्थानकात माथेफिरूचा धुमाकूळ; प्रवाशांवर दगडफेक, सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT