मुंबई

ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना १४ दिवस न्यायालयीन कोठडी

CD

मुंबई, ता. १३ : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या आंदोलनात संशयित आरोपी असलेले ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना आज गिरगाव महानगर दंडाधिकारी न्यायालयाने १४ दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. त्यामुळे त्यांचा जामिनाचा मार्ग मोकळा झाला आहे. ॲड. सदावर्ते यांचा ताबा आता न्यायालयाने सातारा पोलिसांकडे सोपवला आहे. ते चार दिवसांपासून पोलिस कोठडीत होते.

पवार यांच्या ‘सिल्वर ओक’ निवासस्थानी एसटी कामगारांनी केलेल्या आंदोलनात मुंबई पोलिसांनी सदावर्ते यांना अटक केली आहे. आज त्यांना न्यायालयात रिमांडसाठी हजर करण्यात आले. या प्रकरणात आज चंद्रकांत सूर्यवंशी आणि एकाला अटक करण्यात आली आहे. त्यामुळे सदावर्ते यांना सात दिवसांची पोलिस कोठडी देण्याची मागणी विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी केली होती. सदावर्ते यांच्या पत्नी ॲड. जयश्री पाटील यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागपूरमधील संबंधित व्यक्तीही बैठकीस हजर होती. त्यासंदर्भात काही सीसी टीव्ही फुटेजही पोलिसांनी दाखल केले आहेत. त्याशिवाय नागपुरातील व्यक्तीचा संदर्भ आजही देण्यात आला. जमा केलेल्या आर्थिक निधीबाबत अधिक तपास आवश्यक आहे, असे घरत यांनी खंडपीठाला सांगितले.

सदावर्ते यांच्या पोलिस कोठडीला त्यांच्या वकील ॲड. मृण्मयी कुलकर्णी यांनी विरोध केला. सदावर्ते यांच्या पोलिस कोठडीची आवश्यकता नाही, असे त्या म्हणाल्या. ॲड. जयश्री पाटील यांना आरोपी करू नये. त्यांचा याच्याशी काहीही संबंध नाही, असा युक्तिवादही त्यांनी केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने सदावर्ते यांना १४ दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. चंद्रकांत सूर्यवंशी आणि अभिषेक पाटील यांना १६ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी न्यायालयाने सुनावली.

मराठा आरक्षणासंबंधित प्रकरणात वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आक्षेपार्ह विधान केल्याबाबतचा गुन्हा सातारा पोलिस ठाण्यात दीड वर्षांपूर्वी ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात दाखल झाला आहे. त्याचा तपास करण्यासाठी सदावर्ते यांचा ताबा द्यावा, अशी मागणी सातारा पोलिसांनी अर्जाद्वारे केली होती. आता सातारा पोलिस सदावर्ते यांना आर्थर रोड कारागृहातून साताऱ्यामध्ये घेऊन जाणार आहेत.

जयश्री पाटील यांचाही तपास
ॲड. गुणरत्ने सदावर्ते यांच्या पत्नी ॲड. जयश्री पाटील यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंदोलनापूर्वी घेण्यात आलेल्या बैठकीत पाटील सहभागी होत्या आणि त्यांनीही आंदोलकांना चिथावणी दिली, असा आरोप पोलिसांनी ठेवला आहे. त्यांचा तपासही मुंबई पोलिस घेत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ghatkopar Hoarding Collapse: घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेचे बचावकार्य तब्बल ६० तासांनंतर पूर्ण; मुंबई पालिका आयुक्तांनी दिली माहिती

Share Market Today: जागतिक बाजारात जोरदार तेजी; आज कसा असेल शेअर बाजार? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Amit Shah on Kejriwal's bails: 'केजरीवाल यांना विशेष वागणूक मिळाली...', जामिनावर अमित शाहांचा हल्लाबोल

Timepass 3 Fame Actress: ‘टाईमपास 3’ फेम अभिनेत्रीला झालाय 'हा' आजार; पोस्ट शेअर करत म्हणाली, "मी गरोदर नाहीये हे..."

Latest Marathi News Live Update : निवडणूक ड्युटीवर असलेल्या ५० जवानांना घेऊन जाणारी बस पलटली

SCROLL FOR NEXT