court sakal
मुंबई

लहान मुलांना आजी आजोबांचे प्रेम आवश्‍‍यकच

आई-वडिलांबरोबर आजी आजोबांचे प्रेम तो त्यांचा अधिकारअसे मत मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केले

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : लहान मुलांना आई-वडिलांबरोबर आजी-आजोबांचे प्रेमदेखील मिळायला हवे, तो त्यांचा अधिकार असून त्यांच्या व्यक्तिगत विकासासाठी हे आवश्यक आहे, असे मत मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केले असून, दोन वर्षांनंतर वडिलांना त्यांच्या मुलांना भेटण्याची परवानगी दिली.

आईच्या ताब्यात असलेल्या मुलांना जून २०२० पासून वडिलांना भेटू दिले जात नाही, असा आरोप करत एका पित्याने अ‍ॅड. अजिंक्य उडाने यांच्यामार्फत याचिका दाखल केली. त्या याचिकेवर न्या. अनुजा प्रभुदेसाई यांच्यापुढे नुकतीच सुनावणी झाली. या याचिकेच्या निकालाची प्रत नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे.


जी मुले आई-वडिलांपासून वेगळी राहतात, त्यांना त्यांच्या प्रेमापासून वंचित ठेवता येणार नाही. मुलांना अशा प्रकारे वेगळे ठेवणे योग्य नाही, त्यांना आई-वडिलांबरोबर आजी आजोबांचे प्रेम मिळायला हवे, ती त्यांची गरज आणि अधिकार आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. आजोबांची तब्येत ठीक नसून त्यांनी आपल्या नातवाला भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. न्यायालयाने ही मागणी मान्य केली असून दोन दिवस नातवाला भेटण्याची परवानगी दिली आहे. यापूर्वी न्यायालयाने त्यांच्या वाढदिवसाच्या वेळी नातवाला भेटण्याची परवानगी दिली होती; मात्र आईने याला विरोध करून भेट घेऊ दिली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बँकांचा ३ दिवसांचा संप मागे! बैठकीनंतर रात्री उशिरा निर्णय; काय झाली चर्चा?

विश्रांतवाडीत ११ वर्षीय मुलीवर हातपाय बांधून अत्याचाराचे आरोप, ५२ वर्षांच्या नराधमाला अटक; रस्ता रोको आंदोलन

Divya Shinde Arrest : बिग बॉस मराठी फेम अभिनेत्रीची पोलीस कोठडीत रवानगी, डॉक्टरसोबत का झालेला वाद?

Virat Kohli Records: विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड; जगात असा पराक्रम कुणी केला नव्हता, गावस्करांच्या विक्रमाशीही बरोबरी

Pune Crime: गणेश विसर्जन मिरवणुकीतील गर्दीत चोरट्यांचा डल्ला; पुण्यात १४ घटनांत ९.७७ लाखांचे दागिने लंपास

SCROLL FOR NEXT