Anil Deshmukh Anil Deshmukh
मुंबई

अनिल देशमुख यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

मनी लॉण्डरिंग प्रकरणात अटकेत असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची सीबीआय कोठडी वाढवण्यास विशेष न्यायालयाने आज नकार

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मनी लॉण्डरिंग प्रकरणात अटकेत असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची सीबीआय कोठडी वाढवण्यास विशेष न्यायालयाने आज नकार दिला. सीबीआयने रिमांडसाठी दिलेली कारणे असमाधानकारक आहेत, असे मत न्यायालयाने व्यक्त करत त्यांना चौदा दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. दरम्यान, देशमुख यांच्यासह आरोपी पोलिस संजीव पलांडे, कुंदन शिंदे आणि सचिन वाझे यांनाही न्यायालयाने २९ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

देशमुख सध्या सीबीआय कोठडीत आहेत. आज त्यांना आणखी तीन दिवस कोठडी वाढवून द्यावी, अशी मागणी सीबीआयच्या वतीने करण्यात आली. ज्या पोलिसांच्या बदल्यांबाबत तपास करायचा आहे त्यांची चौकशी करायची असल्याने देशमुख यांना तीन दिवस अधिक कोठडी द्यावी, अशी मागणी सीबीआयच्या वतीने करण्यात आली होती. मात्र, विशेष न्या. डी. पी. शिंगाडे यांनी ती फेटाळली. देशमुख यापूर्वी सीबीआय कोठडीत होते आणि त्यांच्या तपासाला पुरेसा वेळ मिळाला आहे. आता दिलेले कारण रिमांडसाठी असमाधानकारक आहे. त्यामुळे त्यांना चौदा दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देत आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

सीबीआयच्या मागणीला ॲड. अनिकेत निकम यांनी देशमुख यांच्या वतीने विरोध केला. सीबीआय सतत गेले अकरा दिवस त्यांची चौकशी करत आहे. त्यामुळे त्यांना आता पुन्हा त्यांचा ताबा देण्याची आवश्यकता नाही, असा युक्तिवाद निकम यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest Shivaji Park : अभिजित दिपके मुंबई पोलिसांच्या रडारवर? शिवाजी पार्कवरील आंदोलन बेकायदेशीर?; CJPच्या चार पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार

Latest Marathi News Live Update : दिवसभरात काय घडलं? देशविदेशातील घडामोडी वाचा एका क्लिकवर

MPSC Student Agitation Issue : एमपीएससी आंदोलनातील फूट; शिष्टमंडळाच्या परस्पर निर्णयाने विद्यार्थ्यांमध्ये संताप

Gangapur News : गंगापूर तालुक्यात खरीप हंगामच्या पंचनाम्याला वेग; दोन दिवसात १६ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्राचा पंचनामा पूर्ण

Satara District Bank Election : भाजप, राष्ट्रवादीने वाढवले उंडाळकरांचे टेन्शन! बाळासाहेब पाटलांसह भाजपचे तीन दिग्गज मैदानात; उमेदवारीचा दावेदार कोण याचीच उत्सुकता

SCROLL FOR NEXT