मुंबई

‘हनुमान चालिसा’ पुस्तिका आऊट आॅफ स्टॉक

CD

मुंबई, ता. १७ : सध्या राजकीय पटलावर भोंगा विरुद्ध हनुमान चालिसा असे राजकारण रंगल्याचे दिसते. काही दिवसांपासून मनसेसोबत इतर राजकीय पक्षांकडून हनुमान चालिसेचे पठण ठिकठिकाणी होऊ लागले आहे. साहजिकच हनुमान चालिसेच्या छोट्या पुस्तिकांची मागणी वाढली आहे. अचानक मागणी वाढल्याने बुक स्टॉलमध्येही हनुमान चालिसा पुस्तिकांचा तुटवडा निर्माण झाल्याचे काही पुस्तक विक्रेत्यांनी सांगितले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याला तीव्र आक्षेप घेऊन ३ मेपर्यंत ते उतरवण्यासाठी सरकारला अल्टिमेटम दिला आहे. भोंग्यांना विरोध म्हणून हनुमान चालिसेचे पठण करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. त्यानंतर मनसेकडून जागोजागी हनुमान चालिसा पठणाचे कार्यक्रम सुरू झाले. साहजिकच मनसे कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर हनुमान चालिसा पुस्तिकांची खरेदी सुरू केली. बऱ्याच ठिकाणी पुस्तिका वाटण्यातही आल्या. परिणामी त्यांची मागणी वाढली. मात्र, त्यांचा पुरेसा साठा नसल्याने तुटवडा जाणवू लागला आहे.

शनिवारी (ता. १६) हनुमान जयंती साजरी झाली. स्वतः राज ठाकरे यांनी पुण्यातील मंदिरात हनुमान चालिसा म्हणत महाआरती केली. राज यांच्या आवाहनामुळे आता राज्यभरात हनुमान चालिसा पठणाचे कार्यक्रम होऊ लागले आहेत. दादर भागात मोठमोठे बुक स्टॉल असल्याने मुंबईतील अनेक भागांतून नागरिक हनुमान चालिसा पुस्तिकेचा शोध घेत तिथे येत आहेत. त्याबद्दल निशांत पारकर यांनी सांगितले, की आम्ही नालासोपारा येथे मंडळातर्फे हनुमान चालिसा पुस्तिकवाटपाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यासाठी आम्हाला किमान ५०० पुस्तिका हव्या आहेत. ठाण्यामध्ये काही ओळखीच्या व्यक्तींकडून माहिती घेतली; मात्र तिथे पुस्तिका उपलब्ध नाही. त्यामुळे स्वतः दादरमध्ये आलो. तीन-चार दुकाने फिरलो, तरीही १० ते १५ च्या वर पुस्तिका मिळाल्या नाहीत. त्यामुळे प्रकाशन संस्थेचा संपर्क क्रमांक मिळवून त्यांच्याकडून पुस्तिका उपलब्ध होतात का, याचा प्रयत्न आता करणार आहे.

फक्त पाचच पुस्तिका मिळाल्या!
दादर येथील आयडियल बुक डेपोत हनुमान चालिसा घेण्यासाठी आलेल्या सविता देसाई म्हणाल्या, की मला २५० पुस्तिका हव्या होत्या. मात्र, दुकानात केवळ पाचच शिल्लक आहेत. त्यामुळे इतर ठिकाणी पुस्तिका कुठे मिळतात का, याचा आता शोध घेणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : माढ्यात सीना नदीत ५ तरुण बुडाले

Chhatrapati Sambhajinagar crime control: दहशत माजवणाऱ्या संदिप फटाकडेला छ. संभाजीनगर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार

Sugarcane Mechanization: ऊसतोड मजुरांच्या मनमानीला कंटाळून शेतकऱ्यांचा यंत्रांकडे मोर्चा; आधुनिक हार्वेस्टरमुळे वेळ व खर्चात बचत

Banjara ST reservation protest: येलदरी जलाशयात बंजारा समाजाचे जलसमाधी आंदोलन; विनोद आडे यांच्या आमरण उपोषणाला व्यापक पाठिंबा

Manwat Health Services Review: सुट्टीच्या दिवशी आरोग्य सुविधांची तपासणी; महालक्ष्मी सणात महिला कर्मचाऱ्यांची ड्युटीमुळे तारांबळ

SCROLL FOR NEXT