मुंबई

चेन पुलिंग करणाऱ्या १०८ प्रवाशांवर कारवाई

CD

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २४ : आपत्कालीन वेळी आणि अत्यावश्यक कारणांसाठी प्रवाशांना उपनगरीय आणि मेल-एक्स्प्रेस गाड्यांमध्ये ‘अलार्म चेन पुलिंग’चा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. मात्र, स्थानकात उशिरा पोहोचणे, मधल्या स्थानकांवर उतरणे-चढणे या क्षुल्लक कारणांसाठी अलार्म चेन पुलिंग करणाऱ्या १०८ प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून ४७ हजार २०० रुपये दंडवसुली करण्यात आली आहे.
मध्य रेल्वेवर १ एप्रिल ते २० एप्रिल या कालावधीत अलार्म चेन पुलिंगच्या गैरवापराची १५७ प्रकरणे नोंदवली गेली. यापैकी सुमारे १०८ प्रवाशांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून ४७ हजार २०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. अनावश्यक परिस्थितीत अलार्म चेन पुलिंग करणे हा रेल्वे कायद्याच्या कलम १४१ नुसार दंडनीय गुन्हा आहे. त्यामुळे प्रवाशांनी त्यांच्या संबंधित गाड्या सुटण्याच्या किमान ३० मिनिटे आधी टर्मिनस/स्टेशनवर पोहोचण्याचे आणि मर्यादित सामान घेऊन जाण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Election 2026 : 'गोकुळ निवडणूक बिनविरोधसाठी प्रस्ताव नाही, आम्ही सर्व जागा लढवणार'; सतेज पाटलांची मोठी घोषणा, 'महायुती'वरही साधला निशाणा

Kagal Woman Dead Body : कागलमध्ये हाय व्होल्टेज टॉवरला महिलेचा मृतदेह; अनोळखी महिलेने ओढणीने गळफास घेतल्याचा प्राथमिक अंदाज

'धाकट्या सुनबाई' मध्ये दिसणार लोकप्रिय इन्फ्लुएन्सर; कोण आहे ती? 'अशी' आहे झी मराठीच्या नव्या मालिकेची कथा

Latest Marathi News Live Update : अनंत चतुर्दशीच्या दिवशी ॲक्वा मेट्रो लाईन ३ रात्रभर सुरू ठेवण्यात येणार

Pune MLC Election 2026 : महाविकास आघाडीचे ठरले! पदवीधरची जागा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला, तर शिक्षक मतदारसंघ पुन्हा काँग्रेसकडेच..; कोणाला मिळणार संधी?

SCROLL FOR NEXT