मुंबई

अतिरिक्त विजेचा राज्याला आधार

CD

अतिरिक्त विजेचा राज्याला आधार
भारनियमनाचे संकट टळले

मुंबई, ता. २३ : उष्णतेच्या लाटांमुळे विजेच्या मागणीत वाढ झाली आहे. ग्राहकांची विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी महावितरण कंपनीला अतिरिक्त वीज उपलब्ध झाल्याने शनिवारी (ता. २३) राज्यात भारनियमन करण्यात आले नसल्याचा दावा, महावितरणच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. खासगी वीज कंपन्यांसोबतच पॉवर एक्स्चेंजमधून वीज घेण्यात येत असल्याने शुक्रवारी (ता. २२) रात्रीपासून भारनियमन केले नसल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्याने सांगितले.

कोळसाटंचाईमुळे देशात विजेचे संकट निर्माण झाले आहे. कोळशाअभावी महानिर्मिती आणि अदाणी या दोन्ही वीजनिर्मिती कंपन्यांकडून महावितरणला कमी वीज उपलब्ध होत होती. त्यामुळे विजेची तूट निर्माण झाल्याने राज्यात भारनियमन करावे लागले होते. महानिर्मितीकडून महावितरणला साधारणत: ६,८०० मेगावॉट वीज मिळत होती. त्यामध्ये वाढ होऊन आता ती ७,५०० मेगावॉटपर्यंत वीज मिळत आहे. अदाणी पॉवर कंपनीकडून ३,०११ मेगावॉटपर्यंत विजेची उपलब्धता झाल्याने राज्यातील भारनियमन टप्प्याटप्प्याने कमी करण्यात आले आहे. पॉवर एक्स्चेंजमधून वीज घेऊन विजेची मागणी पूर्ण केल्याने राज्यात शनिवारी भारनियमन करावे लागले नसल्याचे महावितरणमधील अधिकाऱ्याने सांगितले. राज्यात शनिवारी २४ हजार मेगावॉटहून अधिक विजेची मागणी नोंदवली गेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Mumbai Local: पैसे कट झाले, तिकीट नाही! मुंबई लोकलची ‘सरल’ सेवा प्रवाशांच्या मदतीला, कसे कामी येणार?

Inspirational : Glenn Phillips ची पायलट बनण्यामागची कहाणी; ८ महिने क्रिकेटपासून दूर, पण पठ्ठ्याला स्वस्थ कुठे बसवत होतं...

सिरियलमध्ये आली देशभक्त नागिण! इस्रोच्या रॉकेटला केला सलाम, नेटकऱ्यांनी एकता कपूरला केलं ट्रोल

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT