मुंबई

कोथुर्डे येथील ग्रामस्थांचा क्रशरसाठी विरोध

CD
कोथुर्डे ग्रामस्थांचा क्रशरला विरोध गावातील घरांचे नुकसान होण्याची भीती महाड, ता.१२ (बातमीदार) : महाड ते रायगड या राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा दिलेल्या मार्गाचे रुंदीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. या कामासाठी लागणारी खडी, दगडांसाठी कोथुर्डे गावामध्ये सुरू करण्यात येत असलेल्या क्रशरला येथील ग्रामस्थांनी विरोध केला आहे. कोथुर्डे ग्रामस्थांनी या बाबतचे निवेदन महाडचे तहसीलदार सुरेश काशिद यांना दिले. महाड-रायगड या रस्त्याचे महामार्गमध्ये रूपांतर झाल्याने आता रस्त्याचे काम सुरू करण्यात येत आहे. यासाठी खडी, दगड लागणार असून संबंधित ठेकेदाराने कोथुर्डे गावात क्रशरसाठी जागा घेतली आहे. त्या जागेवर करण्यात येणारे स्फोट गावातील घरांना हादरा बसू शकतात. त्याचप्रमाणे या हादऱ्यामुळे कोथुर्डे धरणाला धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त करीत कोथुर्डे ग्रामस्थांनी या जागेला विरोध केला. याबाबतचे निवेदन सुरेश काशिद यांना दिले. कोथुर्डे ग्रामपंचायत हद्दीतील सर्व्हे नंबर १८२/१५ व १८२/१८ या क्षेत्रामध्ये क्रशरसाठी जागा घेतली आहे. हे ठिकाण हे कोथुर्डे मुळ गावठाणापासून अर्धा ते पाऊण किलोमीटरवर आहे. त्या कोथुर्डे धरणावर महाडसह सुमारे १२ गावांच्या पाणीपुरवठा योजना आहेत. तरी ही परवानगी दिल्यास पुढील हानीस सरकार जबाबदार असेल, असा इशारा देण्यात आला. निवेदन देण्यासाठी काँग्रेसचे महाड तालुका अध्यक्ष राजेंद्र कोरपे, माजी सरपंच मारुती सुतार, पोलिस पाटील विलास पाटील, राम सुतार, दत्ताराम सुतार आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Paper Leak : एमपीएससी पेपरफुटी प्रकरणावरून संभाजी ब्रिगेड आक्रमक; सचिवांच्या तोंडाला काळे फासले, अध्यक्षांनाही इशारा

Kannad News: खिचडी खाल्ल्यानंतर प्रकृती बिघडली; दोन चिमुकल्या भावा-बहिणींचा उपचारादरम्यान मृत्यू

Marbat Festival 2026: काळी मारबत, पिवळी मारबत… नागपूरचा ‘मारबत उत्सव’ नेमका काय आहे?

Latest Marathi News Live Update : MPSC सचिवांना काळं फासलं, संभाजी ब्रिगेडकडून आक्रमक भूमिका

Maratha Reservation: मनाेज जरांगे यांच्या उपोषणाचा १४वा दिवस; अभिजित दिपकेंचा सरकारवर निशाणा, ‘चर्चेसाठी पुढे या’

SCROLL FOR NEXT