मुंबई

अपंग व दानशूर व्यक्तींसाठी महा-शरद

CD

महाड, ता. २४ (बातमीदार) : अपंग व्यक्तींना दैनंदिन जीवनात वावरताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. आपले जीवन सुकर करण्यासाठी त्यांना सहायक उपकरणांची देखील गरज लागते. अपंगांना अशा उपकरणांची मदत करणारे दानशूर व्यक्ती व संस्था, तसेच जिल्ह्यातील अपंग व्यक्ती यांना महा शरद या वेबपोर्टलवर आपली नोंदणी करता येणार आहे.

दानशूर व्यक्ती व अपंग लाभार्थी यांच्यामध्ये दुवा साधला जावा, या उद्देशाने तसेच अपंग व्यक्तींमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. त्यांची माहिती उपलब्ध करण्याच्या उद्देशाने सामाजिक न्याय व विशेष न्याय विभागाने "महा-शरद वेब पोर्टल" वर नोंदणी करण्याचे अभियान सुरू केले आहे. अपंग व्यक्तींना त्यांचे जीवन जगणे सुलभ व्हावे, यासाठी विविध सहायक उपकरणांची आवश्यकता असते. अशा अपंगांना अपंगत्वावर मात करण्यासाठी नेमकी कोणत्या सहायक उपकरणांची आवश्यकता आहे, हे जाणून घेण्यासाठी आवश्यक ती वैद्यकीय चाचणी करून घेणे व त्या आधारे त्यांना लागणारी सहायक उपकरणे निश्चित केली जात असतात. अपंगत्वाचे विविध एकवीस प्रकार असून त्यानुसार समाजातील अनेक दानशूर व्यक्ती, सामाजिक व सेवाभावी संघटना या अपंगांना मदत करण्यासाठी तसेच त्यांना आवश्यक असणाऱ्या विविध उपकरणांचा पुरवठा देखील करत असतात.

संघटनांची नोंदणी आवश्‍यक
अपंग व्यक्ती तसेच अपंग व्यक्तींना साह्य करू इच्छिणाऱ्या दानशूर व्यक्ती, सामाजिक व सेवाभावी संघटनांची नोंदणी www.mahasharad.in या संकेतस्थळावर करणे गरजेचे आहे. याकरिता अपंग व्यक्तींकडे केंद्र सरकारच्या वैश्विक ओळखपत्र प्रणालीअंतर्गत (UDID Card) असणे आवश्यक आहे.

सामाजिक सेवाभावी संस्थांकडून या प्रणालीद्वारे मदत करण्यात येईल, त्यांना आयकरामध्ये ८०-जी अंतर्गत सूट दिली जाणार आहे. तरी रायगड जिल्ह्यातील जास्तीत जास्त अपंग व्यक्ती व दानशूर व्यक्ती आणि सामाजिक सेवाभावी संस्थांनी संकेतस्थळावर नोंदणी करावी.
- डॉ. किरण पाटील,
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिकेतील छेडछाड आता गुन्हा ठरणार

SCROLL FOR NEXT