मुंबई

२०७ ठिकाणचा पाणीटंचाई आराखडा

CD

महाड, ता.२४ (बातमीदार) : मागील वर्षी जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे महापुराचा तडाखा बसलेल्या महाड तालुक्याला आता पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. या वर्षी तालुक्यातील ३३ गावे व १७४ वाड्या अशा २०७ ठिकाणचा टंचाई निवारण आराखडा रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.

महाड तालुका हा डोंगराळ व दुर्गम तालुका असल्याने या तालुक्याला पाणीटंचाईची झळ मोठ्या प्रमाणात बसत असते. बहुसंख्य गावांमध्ये ग्रामीण पाणीपुरवठा योजना कार्यान्वित असतानाही केवळ पाण्याचे स्रोत आटत असल्याने अनेक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. गतवर्षी शंभर ठिकाणी प्रत्यक्षात टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागला होता. या वर्षी महाड पंचायत समितीकडून ३३ गावे आणि १७४ वाड्या अशा दोनशे सात ठिकाणांसाठी आराखडा सादर करण्यात आला आहे. यामध्ये एप्रिल ते जून या कालावधीत टँकरने पाणीपुरवठा अधिक प्रमाणात करावा जाणार आहे. याशिवाय १०१ ठिकाणी विंधन विहीर खोदाई व विंधनविहीर दुरुस्तीचा कार्यक्रम देखील टंचाई निवारण आराखड्यात सामील करण्यात आला आहे. सुमारे ९७ लाखांचा हा टंचाई निवारण आराखडा पंचायत समितीकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.

महाड तालुक्यांमध्ये सावित्री, गांधारी, काळ व नागेश्वरी या मोठ्या नद्या असूनही तालुक्याला दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. मागील वर्षी जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे अनेक गावांत महापूर आला. एवढ्या मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होऊनही तालुक्यात या वर्षी पाणीटंचाईची झळ पोहचणार आहे.

पाणीटंचाईच्या झळा कायम
दरवर्षीच्या आराखड्यात असलेल्या तालुक्यातील पांगारीधार, रावतळी- मानेधार, कावळे धनगरवाडी, कुंभार्डे धनगरवाडी, पाचाड व पाट वाड्या, वाकी गाव व सहा वाड्या अशा काही गावांचे टंचाईचे नष्टचक्र या वर्षीही संपलेले नाही.

गावे ३३
वाड्या १७४
एकूण २०७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं स्वस्त झालं! सलग 4 दिवसांच्या तुफान तेजीला ब्रेक; आता 10 ग्रॅमचा नवा भाव किती?

Madhuri Elephant Return Kolhapur : 'माधुरी' हत्तीण महिन्याभरात कोल्हापूरला येणार!, वनताराची टीम नांदणीत पुनर्वसन केंदाच्या पाहणीसाठी दाखल

India WPI Inflation : देशात महागाईचा स्फोट! सामान्यांच्या खिशाला बसणार फटका, रोजच्या खर्चात होणार वाढ

FIFA World Cup: सहा लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या देशाचा बचाव भेदण्यास स्पेन अपयशी! दिवसातले चारही सामन्यांमध्ये बरोबरी

फुटबॉलचा महाथरार! स्वीडनने टुनिशियाला ५-१ ने उडवलं, तर ९० व्या मिनिटाला मँचेस्टर युनायटेडच्या स्टारने आयव्हरी कोस्टला कसं जिंकवलं? पाहा

SCROLL FOR NEXT