

Cape Verde vs Spain | FIFA World Cup 2026
Sakal
FIFA World Cup 2026 news: सहा लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या व पहिल्यांदाच विश्वकरंडकात सहभागी होत असलेल्या केप वर्दे संघाने माजी विजेता आणि चार वेळच्या युरो विजेत्या स्पेनला चांगलेच झुंजवले. केप वर्देचा अभेद्य बचाव स्पेनच्या खेळाडूंना भेदता आला नाही. अखेर फुटबॉल विश्वकरंडकातील स्पेन-केप वर्दे यांच्यामधील एच गटातील लढत गोल शून्य बरोबरीत राहिली. स्पेन-केप वर्दे यांच्यामधील लढत सुरू होण्याआधी गत युरो विजेत्याकडे या लढतीतील विजेता म्हणून बघितले जात होते.