Chavdar Lake  sakal
मुंबई

ऐतिहासिक चवदार तळ्याचा परिसर लवकरच सौरदिव्यांनी उजळणार

कामांसाठी सामाजिक न्याय विभागाने महाड पालिकेला ३० लाखांचा निधी नुकताच दिला

सकाळ वृत्तसेवा

महाड : येथील ऐतिहासिक चवदार तळ्याचा परिसर लवकरच सौरदिव्यांनी उजळणार आहे. सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरेही बसवण्यात येणार आहेत. या कामांसाठी सामाजिक न्याय विभागाने महाड पालिकेला ३० लाखांचा निधी नुकताच दिला.

चवदार तळ्याचे पाणी प्राशन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक न्याय प्रस्थापित केला होता. यामुळे तळ्याला विशेष महत्त्व आहे. पालिकेनेही या तळ्याकडे विशेष लक्ष दिले असून तळ्याचे सुशोभीकरण केले आहे, परंतु तळ्याच्या परिसरात पथदिवे व वीज प्रकाश मर्यादित स्वरूपात होता, परंतु आता चवदार तळ्याचा परिसर उजळून निघणार आहे. सामाजिक न्याय विभागाने यासाठी महाड पालिकेला ३० लाख रुपयांचा निधी दिला आहे. सध्या तळ्याच्या दक्षिण बाजूस असलेल्या मुख्य रस्त्यावर पाच सौरदिवे बसवण्यात आले आहेत.
तळ्याच्या सभोवताली सुमारे २३ सौरदिवे बसवण्याचे निश्‍चित केले आहे. ‘व्हेलोरा इंडस्ट्रीज’कडून हे काम सुरू असून या कामामुळे चवदार तळे अधिकच आकर्षक दिसणार आहे.

तळे परिसराच्या सुरक्षेचीही खबरदारी घेण्यात आली आहे. त्यानुसार २२ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत.
रायगड जिल्हा सामाजिक न्याय विभागाकडून चवदार तळे येथे सौरदिवे आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी ३० लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. यामुळे चवदार तळ्याचा परिसर सुशोभित होईल.
- सुहास कांबळे, नगर अभियंता, महाड पालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Property tax: ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांवरील करमाफीवरून वाद; भाजपने पुणेकरांची फसवणूक केल्याचा 'आप'चा आरोप

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीच्या प्रतिक्षा, पण पाऊस करणार गेम? पहिल्या T20I सामन्यासाठी काय आहेत हवामान अंदाज?

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Pune Crime: पुण्यात मित्रच ठरला मारेकरी! किरकोळ वादाचे पर्यवसान खुनात; मित्रानेच लोखंडी पाईपने डोक्यात वार करून घेतला जीव

Civic Works Halted: मतदार यादी पडताळणीमुळे पथ व भवन विभागाची कामे ठप्प; अभियंत्यांना मोहिमेतून मुक्त करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

SCROLL FOR NEXT