मुंबई

छ.शिवरायांच्या मुल्यांवर वाटचाल केल्यास देशाचे कल्याण -ज्योतिरादित्य सिंधिया

CD

शिवरायांची मूल्ये देशासाठी आदर्शवत

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचे रायगडावर प्रतिपादन

महाड, ता. १६ (बातमीदार) : छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या जीवनात सेवा आणि समर्पण या दोन मूल्यांचा मार्ग स्वीकारला. प्रत्येक भारतीयाने अखंड भारताचे स्वप्न उराशी बाळगून या मूल्यांवर वाटचाल केली तर देशाचे कल्याण होईल, असा विश्वास केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी रायगड किल्ल्यावर आज व्यक्त केला.

किल्ले रायगडावर श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ, पुणे आणि स्थानिक उत्सव समिती, महाड यांच्या वतीने छत्रपती शिवरायांच्या ३४२ व्या पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन सभा आयोजित करण्यात आली होती. सेनापती महादजी शिंदे यांचे वंशज ज्योतिरादित्य सिंधिया यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेत पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर राजसदरेवर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला आमदार भरत गोगावले, आमदार प्रशांत ठाकूर, उत्सव समितीचे अध्यक्ष रघुजी आंग्रे आदी मान्यवर उपस्थित होते.

शिवरायांनी लहान वयात कोणताही अनुभव नसताना, सैन्याची कमतरता, अशा स्थितीत केवळ बुद्धिमत्ता आणि युद्धनितीवर स्वराज्याची स्थापना केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी सामान्य जनतेच्या कल्याणासाठी कायम दूरदृष्टी पाहिली. त्यांची ही गाथा सांगण्यासाठी कित्येक वर्षेही अपुरी पडतील. त्यांनी नौदलाची उभारणी करून समुद्र तटाचे रक्षण कसे करावे, हे दाखवून दिले. शिवाजी महाराजांनी जातीपातीच्या पलीकडे जात आपल्या सैन्यात वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांना सामावून घेतले. मराठ्यांचा इतिहास देशाच्या कानाकोपऱ्यात असून शौर्य, बलिदान, वीरता असलेला हा इतिहास असल्याचे गौरवोद्‍गार सिंधिया यांनी काढले.

पुरस्कारांचे वितरण
नौदलाचे निवृत्त सर्जन कमांडर व इतिहास संशोधक डॉ. उदय कुलकर्णी यांना उत्सव समितीच्या वतीने देण्यात येणारा श्री शिवपुण्यस्मृती रायगड पुरस्कार देण्यात आला. निवृत्त व्हाईस अॅडमिरल मुरलीधर पवार यांचा सपत्निक विशेष सत्कार करण्यात आला. या वेळी सुभेदार तानाजी मालुसरे व सूर्याजी मालुसरे यांच्या वंशजांचा सत्कार करण्यात आला. शिवरायमुद्रा आणि शिवऋषींची शिवसृष्टी या ग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमानंतर राजसदर ते शिवसमाधीपर्यंत छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेची पालखी मिरवणूक काढण्यात आली.

फोटो
१) अभिवादन सभेत बोलताना ज्योतिरादित्य सिंधिया.
२) ज्योतिरादित्य सिंधिया यांना स्मृतिचिन्ह देऊन गौरवताना रघुजीराजे आंग्रे.
३) कार्यक्रमाला उपस्थित शिवप्रेमी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! शेतकऱ्यांना ३० जूनपूर्वी कर्जमाफीचा लाभ; २ लाखांचे थकीत पीककर्जाचीच माफी, अशी नसणार अट; ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार लाभ, वाचा...

Quick & Easy Morning Breakfast Recipe: आठवड्याची सुरुवात करा हेल्दी नाश्त्याने ; फक्त 10 मिनिटांत बनवा 'मल्टी व्हिटामिन भेळ'

Panchang Today 30 Marach 2026 : आजचा दिवस शुभ; मुहूर्त, राहू काळ आणि उपाय जाणून घ्या

गुन्हेगारांचे धाबे दणाणले! सोलापूर पोलिस अधीक्षकांचे विशेष पथक; जुगार अड्डे, अवैध वाळू वाहतूक, ऑर्केस्ट्रा बार, अवैध दारुनिर्मिती, विक्रीवर असणार लक्ष

MI vs KKR Live : रायन रिकल्टनच्या ८१ धावा, रोहित शर्माच्या ७८... तरीही प्लेअर ऑफ दी मॅच पुरस्कार तिसऱ्यालाच; जाणून घ्या का?

SCROLL FOR NEXT