मुंबई

किरवली गावातील नळ पाणी योजना सहा महिन्यापासून बंद

CD
किरवली गावातील नळपाणी योजना बंद सहा महिन्यांपासून पाण्यासाठी वणवण कर्जत, ता. १२ (बातमीदार) : तालुक्यातील किरवली गावात १७ वर्षांपूर्वी सुरू केलेली नळ पाणीपुरवठा योजना सहा महिन्यांपूर्वी बंद पडली. त्यामुळे पाण्यासाठी ग्रामस्थांना वणवण फिरावे लागते. या योजनेतील त्रुटी दूर करून ती त्वरित दुरुस्त करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. किरवली गावाची नळ पाणी योजना उल्हास नदीवर आधारित आहे. मात्र जुलै महिन्यात मुसळधार पावसात पाणी साठवण्याची विहीर कोसळली. पंपही नादुरुस्त झाला. तेव्हापासून ही योजना बंद आहे. त्यामुळे येथील महिलांना गावातील खासगी कूपनलिकेचा आधार घ्यावा लागतो. काही ग्रामस्थ टँकरद्वारे पाण्याची मागणी पूर्ण करतात; परंतु आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. त्यामुळे जुनी पाणीपुरवठा योजना सुरू करण्याची मागणी करण्यात येत आहे. --------------- किरवली गावाच्या पाणीपुरवठा योजनेत आमदार महेंद्र थोरवे यांनी लक्ष घातले असून ते लवकरच जल जीवन मिशनच्या माध्यमातून नवीन पाणी योजनेसाठी निधीची मिळवून देणार आहेत. जुलैच्या पावसात विहिरींची पडझड झाली. त्यावर बसविलेला वीज पंप ही नादुरुस्त झाला. - संतोष साबरी, सरपंच, किरवली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्र महिला आयोगाच्या पुढील अध्यक्षा कोण? दोन दमदार महिला नेत्यांची नावे समोर, नव्या चेहऱ्यांबाबत मोठी माहिती समोर

IPL 2026 Marathi News: महेंद्रसिंग धोनी पूर्णपणे तंदुरुस्त नाही? Video ने वाढवली चिंता; इरफान म्हणाला तसा, ही Dhoniची शेवटची IPL

लग्नाच्या वेळी जितके पैसे खर्च केले ते केले नसते तर... अमृता खानविलकरचं वक्तव्य चर्चेत, म्हणते- हिमांशू आणि मी...

Kolhapur : जिल्हा परिषद विषय समिती फॉर्म्युला ठरला; शिवसेनेला बांधकाम- आरोग्य, तर जनसुराज्यला शिक्षण-अर्थ

तुंबाडची मंजुळा सिनेमा दिग्गज कलाकारांची मांदियाळी ! अनोखी कल्पना वापरत उलगडली कास्ट

SCROLL FOR NEXT