मुंबई

जात पडताळणी कार्यालयाचा अजब कारभार

CD
जात पडताळणी कार्यालयाचा अजब कारभार शाळा प्रवेश नोंद उताऱ्यासाठी रिकाम्या हाती परतण्याची वेळ अलिबाग, ता. १३ (बातमीदार) : येथील जात पडताळणी कार्यालयात निकषानुसार जोडण्यात आलेल्या पुराव्याव्यतिरिक्त शाळा प्रवेशाच्या नोंदीच्या उताऱ्याची मागणी करण्यात येते. या प्रकारामुळे नागरिकांची दगदग वाढली आहे. जात पडताळणी कार्यालयाच्या या अजब कारभारामुळे आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र जात पडताळणी कार्यालय असावे, असा निर्णय सरकारने घेतला. त्यानुसार २१ नोव्हेंबर २०१६ पासून रायगडमध्ये समिती कार्यालय चेंढरे येथे सुरू झाले. कार्यालयात अनुसूचित जाती, इतर मागासवर्गातील विद्यार्थ्यांची व्यावसायिक शिक्षणासाठी, तर वेगवेगळ्या निवडणुकीसाठी उमेदवारांची समितीमार्फत जात पडताळणी केली जाते. त्यासाठी शिफारस पत्र, ऑनलाईन केलेला अर्ज, तसेच वेगवेगळे दाखल्यांची प्रत जोडून कार्यालयात जात पडताळणीसाठी अर्ज जमा केला जातो; परंतु गेल्या काही दिवसांपासून पडताळणी समितीकडून जोडण्यात आलेल्या पुराव्यामध्ये प्रवेश नोंदीचा उतारा घेण्याचा प्रकार सुरू आहे. यामुळे जात पडताळणीसाठी आलेल्या नागरिकांना व विद्यार्थ्यांना कागदपत्रे जमा न करता रिकाम्या हाती परतण्याची वेळ येत आहे. ------------------------- मुलीच्या शिक्षणासाठी जात पडताळणीसाठी लागणारी कागदपत्रे तयार करून कार्यालयात जमा करण्यासाठी आलो. त्यामध्ये माझ्या नावाचा जात पडताळणी प्रमाणपत्र जोडण्यात आले असून लागणारा शाळा सोडण्याचा पुरावा देखील जोडण्यात आला; परंतु या कार्यालयाकडून शाळेत प्रवेश नोंदीचा दाखला मागण्यात आला आहे. या प्रकारामुळे आता परत रिकाम्या हाती जावे लागते. सर्व पूर्तता करूनही या दाखल्यासाठी अडविले जात आहे. - गणेश आरेकर, नागरिक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT