मुंबई

बारा हजार कॅमेरातून राहणार नजर

CD
रायगड जिल्ह्यावर १२ हजार कॅमेऱ्यांची नजर गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी रायगड पोलिसांचा प्रयत्न प्रमोद जाधव : सकाळ वृत्तसेवा अलिबाग, ता. १३ : पर्यटन व औद्योगिकीकरणासाठी प्रसिद्ध असलेल्या जिल्ह्यातील नागरिकांची सुरक्षेसाठी रायगड पोलिस दलाच्या प्रयत्नातून जिल्ह्यात १२ हजारपेक्षा अधिक सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. हे साधन उपयुक्त ठरत असून वर्षभरात ४२ गुन्हे यामुळे उघडकीस आले आहेत. रायगड जिल्ह्यातील वेगवेगळ्या प्रकल्पांमुळे देशभरातील नागरिक येत आहेत. पर्यटनवाढीमुळेही जिल्ह्यात वर्दळ वाढलेली आहे. यामुळे दुचाकी चोरी, घरफोडी अशा घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. त्यामुळे रायगडचे पोलिस अधीक्षक अशोक दुधे यांनी या घटनांबाबत गांभीर्याने दखल घेतली. गुन्ह्यांची उकल तातडीने व्हावी यासाठी सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार २८ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत सीसी टीव्ही कॅमेरे बसवून घेण्याच्या सूचना दिल्या. शासकीय व वेगवेगळ्या माध्यमातून सीसी टीव्ही कॅमेरे मुख्य प्रवेशद्वार, बाजारपेठ व अन्य सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आले. आतापर्यंत १२ हजार ९३ ठिकाणी असे कॅमेरे बसवण्यात आले आहेत. त्याचा परिणाम जिल्ह्यातील चोरी, घरफोडी व अन्य गैर प्रकारावर अंकुश ठेवण्यास पोलिसांना यश आले. रायगड जिल्ह्यात सीसी टीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने ४२ गुन्हे उघडकीस आले. जिल्ह्यात बसविण्यात आलेल्या या सीसी टीव्ही कॅमेरांमुळे सार्वजनिक ठिकाणी होणारे गैरप्रकार, महिलांची छेडछाड, तसेच अन्य गुन्ह्यांवर अंकुश ठेवण्यास मदत झाली आहे. ..... सीसी टीव्ही कॅमेरांमुळे अनेक गुन्ह्यांची उकल करण्यास मदत होत आहे. त्यामुळे जिल्ह्यात सर्व ठिकाणी सीसी टीव्ही कॅमेरे लावण्याच्या सूचना पोलिस अधिकाऱ्यांना केली. आतापर्यंत जिल्ह्यात १२ हजार ठिकाणी सीसी कॅमेरे लावण्यात आले आहेत. यामुळे गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्यास मदत होईल. - अशोक दुधे, पोलिस अधीक्षक, रायगड. ............... अलिबागमधील चोरी सीसी टीव्ही कॅमेरातून उघडकीस अलिबाग शहरातील बाजारपेठेतील एका घरात दोन महिन्यांपूर्वी चोरी झाली होती. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने या चोरट्याचा तपास सुरू केला. बाजार पेठेजवळ एका औषध दुकानाच्या बाजूला असलेल्या सीसी टीव्ही कॅमेरातील चित्रीकरणात एक संशयित व्यक्ती दिसून आली. पथकाने संबंधित चोरट्यांची खबऱ्यांमार्फत माहिती घेऊन त्याला ताब्यात घेतले. हा गुन्हा सीसी टीव्ही कॅमेऱ्यामुळे उघडकीस आला. ..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Government Hospital Accident : मिरज शासकीय रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराची कमान कोसळली; अनेक कामगार जखमी

Russia-Ukraine War: रशियाच्या ऑइल रिफायनरीवर युक्रेनचे हल्ले! डिझेलचा तुटवडा अन् अमेरिकेतही दर वाढले; भारतात पेट्रोल-डिझेल महागणार?

Drought Disaster: निसर्गाचा दुहेरी फटका! आधी पावसाने ओढ दिली, आता वादळाने पाच एकर ऊस आडवा केला

Marathi News Live Updates : मिरज शासकीय रुग्णालयाचा स्लॅब कोसळून दोघांचा मृत्यू

Jamui Minor Viral Video : आठ जणांनी अल्पवयीन मुला-मुलीला भर रस्त्यात घेरलं; मुलीसोबत धक्कादायक कृत्य, सोशल मीडियावर VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT