मुंबई

सुकी मासळी स्वस्त, खवय्यांची चंगळ

CD
सुकट, वाकटी, बोंबील १५० रुपयांनी स्वस्त समुद्रातील माशांची आवक वाढल्याने खवय्यांची चंगळ अमित गवळे ः सकाळ वृत्तसेवा पाली, ता. १३ (वार्ताहर) : सुक्या मासळीची बाजारातही आवक वाढली आहे. यामुळे जिल्ह्यात मागील महिन्याच्या तुलनेत या महिन्यात सुक्या मासळीचे दर घटले आहेत. दोन हजार ते २२०० रुपये किलोने मिळणारे सोडे आता १६०० ते १८०० रुपये किलोने मिळत आहेत. सुकट, वाकटी, बोंबील आदींच्या किमतीही १०० ते १५० रुपये प्रतिकिलोने घटल्या आहेत. त्यामुळे खवय्यांची चंगळ आहे. जिल्ह्यातील आठवडा बाजार आणि मासळी बाजारात सुकी मासळीच्या खरेदीसाठी गर्दी दिसत आहे. पर्यटक देखील आवर्जून सुकी मासळी खरेदी करतात. लॉकडाऊनच्या भीतीने देखील काही जण सुक्या मासळीचा साठा करीत आहेत. मागील महिन्यात खराब हवामान व अवकाळी पाऊस यामुळे खोल समुद्रातील मासेमारी कमी झाली होती. त्यामुळे अगदी कमी प्रमाणात मासळी सापडत होती. सापडलेली मासळी ताजी विकण्यावर मच्छीमारांचा कल होता. मात्र आता मासेमारी जोरात सुरू झाली असून मोठ्या प्रमाणात मासे सापडत आहेत. हे मासे सुकविण्याकडे कल दिसत आहे. ................................ सुक्या मासळीचे भाव सध्या उतरले आहेत. त्यामुळे सुकी मासळी खरेदी करत आहोत. या मासळीचा दर्जा देखील चांगला आहे. - प्रियांका गोसावी, सुकी मासळी खवय्या, माणगाव. ...... मागील महिन्याच्या तुलनेत या महिन्यात सुक्या मासळीचे भाव कमी झाले आहेत. समुद्रात मुबलक मासे मिळत आहेत. त्यामुळे राहिलेली मासळी सुकविण्याकडे अधिक कल असल्याने आवक वाढली आहे. भाव देखिल कमी झाले आहेत. - सरफराज पानसरे, सुकी मासळी विक्रेता, पाली ................... सुकी मासळी भाव मासे डिसेंबर जानेवारी (प्रतिकिलो/रुपयांत) साधे सोडे - १६००- १२०० - अंबाडी ५०० - ४०० जवळा ३०० -२४० बोंबील ५००-४०० साधी सुकट ३००-२०० माकुल ६०० - ५०० वाकटी ५००- ४०० मांदेली २५०-२०० रेपटी २५०- २००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra SSC Exam 2027 : दहावीच्या विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा! बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

IND vs AFG 3rd T20I: इथे-तिथे-सगळीकडे राशिद खान... भन्नाट रन आऊट अन् दोन अविश्वसनीय झेलने फिरवली मॅच; Video Viral

US OPT Fee : अमेरिकेत शिक्षणानंतर नोकरी करण्याचा मार्ग महागणार? द्यावे लागणार एक कोटींचे OPT शुल्क, भारतीय विद्यार्थ्यांवर मोठा परिणाम

Eknath Shinde Dare Village : शिवसेना पक्ष-धनुष्यबाण चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असतानाच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट दरे गावात दाखल

IND VS AFG 3RD T20I: अभिषेक शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड अन् टीम इंडियाचा धावांचा एव्हरेस्ट! संजू सॅमसनची सलग फिफ्टी...

SCROLL FOR NEXT