jsw esakal
मुंबई

अलिबाग : जेएसडब्ल्युवर गुन्हा दाखल करा; पंडित पाटील यांचा आक्रमक पवित्रा

जेएसडब्ल्यूविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार

सकाळ वृत्तसेवा

अलिबाग : धरमतर खाडी परिसरातील गावांमध्ये ध्वनी, वायू आणि जलप्रदूषणास (water pollution) जेएसडब्ल्यू कंपनी (JSW company) कारणीभूत ठरली आहे, असा आरोप करून या कंपनीवर कारवाई करण्याची मागणी अलिबागचे माजी आमदार पंडित (सुभाष) पाटील (Pandit patil) यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. या संदर्भात त्यांनी पोयनाड पोलिस ठाण्यात (Poynad police station) तक्रार दाखल केली आहे. धरमतर खाडी (Dharamtar creek) परिसरातील पेझारी, कुसुंबळे, खारकारवी, डोलवी, शहाबाज यांसारख्या गावांमध्ये जेएसडब्ल्यूमुळे प्रदूषण होते. या भागात दिवसभर मोठ्या प्रमाणात धूळ उडत असल्याने नागरिकांना श्वसनाचा त्रास जाणवत आहे, असे पंडित पाटील यांनी सांगितले.

जलप्रदूषणामुळे येथील मासेमारीचा व्यवसायही बुडालेला आहे. पिण्याचे पाणी देखील दूषित झाले आहे. त्याचबरोबर मागील काही दिवसांत ध्वनिप्रदूषणाचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. भल्या पहाटे कंपनीतून येणाऱ्या आवाजाने येथील नागरिकांना झोपेचा त्रास जाणवू लागला आहे, असा आरोप पाटील यांनी केला आहे. यामुळे कंपनीवर गुन्हा दाखल न झाल्यास शेतकरी कामगार पक्ष आक्रमक पवित्रा घेणार आहे, असा इशारा पंडित पाटील यांनी दिला.

जेएसडब्ल्यू कंपनीतून मिळणारा फायदा दुसऱ्यांनी घ्यायचा आणि त्रास येथील नागरिकांनी भोगायचा, हे योग्य नाही. प्रदूषण कमी करण्यासंदर्भातही कोणत्याच विभागाकडून या कंपनीला विचारणा होत नाही, त्यामुळे कंपनी प्रशासन बेलगाम झाले आहे.

- पंडित पाटील, माजी आमदार.

माजी आमदार पंडित पाटील यांनी पोयनाड पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज केला आहे. यात त्यांनी कंपनीमुळे प्रदूषण होत असल्याचे नमूद केले आहे. संबंधित कंपनी ही वडखळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत असल्याने तपासासाठी हा अर्ज वडखळ पोलिसांकडे पाठविण्याची कार्यवाही सुरू आहे.

- राहुल अतिग्रे, पोलिस निरीक्षक, पोयनाड ठाणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Crime : भाजप नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक हल्ला; गंभीर जखमी, संतप्त कार्यकर्त्यांची रुग्णालयासमोर गर्दी

Pune Drone Cluster: पुण्यात ड्रोन अन् खाद्यप्रक्रिया क्लस्टर; राज्यातील पहिलाच उपक्रम, भोसरी, हडपसरमध्ये सुरू होणार प्रकल्प!

Pandharpur News: पंढरपुरातील प्रस्तावित कॉरिडॉरला तीव्र विरोध; सुब्रह्मण्यम स्वामींच्या मोहिमेस पाठिंबा देण्यासाठी बाधितांचा शंखनाद!

Latest Marathi News Update: काँग्रेस भवनात दगडफेक प्रकरणी १०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हा

Solapur News: भारताच्या दणदणीत विजयानंतर सोलापुरात जल्लोष; पाकिस्‍तानला लाेळविताच आतषबाजी, पेढे वाटून, तिरंगा उंचावून आनंदोत्सव साजरा!

SCROLL FOR NEXT