मुंबई

राष्ट्रवादीच्या गीता पालरेचा; तर शिवसेनेतर्फे सचिन जवके यांचे अर्ज

CD
पाली, ता. ५ (वार्ताहर) : अष्टविनायक तीर्थक्षेत्र पाली नगरपंचायतीची पहिली निवडणूक नुकतीच झाली असून नगराध्यक्ष पदासाठी गुरुवारी (ता.१०) निवड होणार आहे. शुक्रवारी (ता.४) नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीच्या गीता पालरेचा; तर शिवसेनेचे सचिन जवके यांचे अर्ज दाखल झाले आहेत. नगरपंचायतीच्या १७ नगरसेवकांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस व शेकाप आघाडीचे १० नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे आघाडीकडे स्पष्ट बहुमत आहे. परिणामी गीता पालरेचा यांचे पारडे जड आहे. शिवसेनेचे चार, भाजपचे २ आणि १ अपक्ष असे इतर नगरसेवक आहेत. काही राजकीय कूटनीती किंवा दगाफटका झाल्यास चुरस निर्माण होऊ शकते, अन्यथा शिवसेनेला लढत सोपी नाही. उपनगराध्यक्ष पदासाठी गुरुवारी (ता.१०) सकाळी १० ते १२ यावेळेत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. नगराध्यक्षपदाच्या निवडीनंतर १५ मिनिटांनी उपनगराध्यक्ष पदाचे अर्ज स्वीकारले जातील. दुपारी २ नंतर अर्जाची छाननी होऊन पुढील कार्यवाही केली जाईल, असे पीठासीन अधिकारी डॉ. यशवंत माने यांनी सांगितले. पालरेचा यांचा अर्ज देताना राष्ट्रवादी व शेकापचे सर्व नगरसेवक सुधागड तालुका अध्यक्ष रमेश साळुंखे, रायगड जिल्हा परिषद सदस्य सुरेश खैरे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष ग. रा. म्हात्रे, दीपक पवार, शहर अध्यक्ष अभिजित चांदोरकर, तालुका युवक अध्यक्ष संदेश शेवाळे, प्रकाश पालरेचा, सुशील शिंदे, किरण खंडागळे व कार्यकर्ते उपस्थित होते; तर शिवसेनेचे सचिन जवके यांचा अर्ज दाखल करताना शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांसह रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य रवींद्र देशमुख, शिवसेना नेते राजेंद्र राऊत, संदीप दपके, सचिन डोबले, किशोर खरीवले, किरण पिंपळे, सतीश देशमुख व कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chiplun Crime : प्रेयसीसाठी मृतदेहाची लावली विल्हेवाट? हाडांच्या तुकड्यांनी उघड केलं 4 लाखांच्या बदल्याचं भयंकर गुपित, मुंबईतील महिलेला अटक

'ते ज्येष्ठ आहेत म्हणून मी घाबरलं पाहिजे असं...' प्रसिद्ध अभिनेत्री नाना पाटेकरांबद्दल बोलताना म्हणाली...'मी कोणालाच घाबरत...'

Latest Marathi News Live Update : किल्ले रायगडावरील शिवसमाधी परिसरात लावलेला अनधिकृत बोर्ड रायगड जिल्हाध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी काढून टाकला

College Student Death : शिक्षणाला कंटाळून सावंतवाडीत 17 वर्षीय विद्यार्थ्यानं गॅलरीतून उडी मारून संपवलं आयुष्य; चिठ्ठीतील मजकुराने उडाली खळबळ

High Court: आधी सेक्स नंतर ब्लॅकमेल... असंच सुरू राहीलं तर सुसंस्कृत समाजात राहणे कठीण; हायकोर्टाने दिले कारवाईचे आदेश!

SCROLL FOR NEXT