water scarcity sakal media
मुंबई

कर्जत तालुक्याला पाणी टंचाईच्या झळा; ५७ आदिवासी वाड्यांचा समावेश

हेमंत देशमुख

कर्जत : उन्हाळ्याची चाहूल लागताच कर्जत (Karjat) तालुक्यातील ग्रामीण भागात पाणीटंचाईच्या झळा (water scarcity) बसण्यास सुरुवात झाली आहे. एप्रिल-मे मध्ये परिस्थिती अधिकच होण्याची शक्यता आहे. सध्या टंचाईग्रस्त गावे, वाड्यांना वेळप्रसंगी टँकरने पाणीपुरवठा (Tanker water supply) करण्यासाठी कर्जत पंचायत समितीने पाणी पुरवठा कृती आरखडा तयार केला. यामध्ये संभाव्य १८ गावे आणि ५७ आदिवासी वाड्यांचा समावेश केला आहे.

कर्जत तालुक्यात उल्हास, कोल्हारे, पेज, पोश्री या प्रमुख नद्या आहेत. उल्हास, पेज नदी वगळता उन्हाळ्यात बाकी नद्या कोरड्या पडतात. त्यामुळे या नद्यांच्या आजूबाजूच्या परिसरातील भूजल पातळी खालावून कूपनलिका आणि त्यावर अवलंबून असणाऱ्या नळ पाणी योजना बंद पडतात. परिणामी या गावे वाड्या-पाड्यातील महिलांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागते.
पाणीटंचाईच्या समस्येवर मत करण्यासाठी विंधन विहिरी खोदणे, विहिरींची दुरुस्ती करणे आणि ट्रँकरने पाणीपुरवठा केला जातो. यावर्षी कर्जत तालुक्यात पाणीटंचाई भासणाऱ्या गावे व वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्यासाठी ३५ लाख ६५ हजारांच्या निधीची तरतूद करण्यात आली.

कृती आराखड्यातील गावे

मोग्रज, पिंगळस, धामणी, खानंद, अंभेरपाडा, मोहोपाडा, भोपळेवाडी, सुतारपाडा, गरूडपाडा, खांडस, ओलमण, चेवणे, नांदगाव, ढाक, तुंगी, पेठ आणि अंथराट, वरेडी या १८ गावांचा समावेश पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये करण्यात आला. तालुक्यातील आनंदवाडी, भक्ताचीवाडी, भल्याचीवाडी, पादिरवाडी, जांभूळवाडी, वडाचीवाडी, टेपाचीवाडी, मोरेवाडी, ताडवाडी, बनाचीवाडी, बेलाचीवाडी, भागूचीवाडी दोन्ही, मेंगाळवाडी, चिमटेवाडी, विठ्ठलवाडी, तेलंगवाडी, किरवली ठाकूरवाडी, सावरगाव ठाकूरवाडी, हऱ्याचीवाडी, विकासवाडी, आषाने ठाकूरवाडी, नागेवाडी, जांभूळवाडी, वारे, बोरीचीवाडी, कळंब.

पाणीटंचाईची समस्या दूर करण्यासाठी कूपनलिका, विंधन विहिरी खोदल्या जाणार असून काही दुरुस्त करण्यात आल्यात. पाणीपुरवठा कृती आराखड्यात संभाव्य १८ गावे आणि ५७ आदिवासी वाड्यांचा समावेश केला असून यांना टँकरने पाणीपुरवठा केला जाईल.
- गोवर्धन नखाते, स्थापत्य अभियंता, कर्जत पंचायत समिती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'शिवाजीनगर मेट्रो' स्थानकाचे नाव बदलण्यावरून वाद; फडणवीसांचा तीव्र विरोध, कर्नाटकचे CM म्हणाले, 'आम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे...'

Shivaji University : शिवाजी विद्यापीठाच्या सत्तर टक्के प्रश्नपत्रिका ‘ऑनलाईन सेट’, डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर

Chhagan Bhujbal : ‘ओबीसीतूनच आरक्षण हवे, तर इतर सर्व आरक्षण सोडणार का?’ भुजबळांचे आव्हान

Latest Marathi News Updates : विंचूर उपबाजार आवारात कांद्याला कमी भाव, संतप्त शेतकऱ्यांचा रस्ता रोको आंदोलन

वरिष्ठ गाढवाला घोडा म्हणाले तर तुम्हीही घोडाच म्हणा; सरकारी कामाबाबत गडकरींचं विधान

SCROLL FOR NEXT